आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गतस्तरावर खाद्यतेल १२ रुपयांनी स्वस्त

रशिया युक्रेनमध्ये समझोता होण्याचे संकेत
Edible oil fell by Rs 12 internationally and domestically nagpur
Edible oil fell by Rs 12 internationally and domestically nagpur Food Oil

नागपूर : चीनच्या परराष्ट्रमंत्र्यापाठोपाठ जर्मनीच्या संरक्षण सल्लागारांचे दिल्लीला पोहोचणे. त्यानंतर रशिया, अमेरिका व इंग्लंडच्या परराष्ट्रपरराष्ट्र मंत्र्यांचे आगमन हे रशिया-युक्रेन युद्ध समाप्तीची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी, युद्धामुळे झालेली भाववाढ कमी होण्याचे महत्त्वाचे शुभ संकेत मिळत आहेत. यामुळेच आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गतस्तरावर खाद्य तेलाच्या दरात प्रति किलो दहा ते १२ रुपयांची घट झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांना इंधन दरवाढीचा फटका बसत असताना थोडा दिलासा मिळाला आहे.

मराठी नववर्षाच्या मुहुर्तावर राज्य कोरोनाच्या निर्बंधातून पूर्णपणे मुक्त झाले. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली. या आनंदी वातावरणात देशातील बाजारात सोयाबीन, पाम, सनफ्लावर आदी तेलांच्या दरात घट झाल्याने नववर्षात सुखद धक्का मिळाला. गेल्या पाच ते सहा दिवसात या तेलाच्या दरात प्रति पिंप (१५ किलो) मागे १५० ते २०० रुपयांची घट झाली आहे. मागील आठवड्यात २६३०- २६५० रुपये प्रति पिप्याचे दर २५०० ते २५२० रुपयावर आले. तसेच २५०० ते २५२० रुपये असलेले राईसब्रान तेल २४५० ते २४७० रुपयांवर आले आहे.

रशिया युक्रेनमध्ये समझोता होण्याचे संकेत आहेत.परिणामी गेल्या आठवड्यात किरकोळ बाजारात १८० रुपये किलो असलेले सोयाबीन तेल आता १६५ ते १७० रुपयावर आले आहे, असे नागपूर किरकोळ व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी सांगितले.

गव्हाच्या दरात घट

रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे देशातून मोठ्या प्रमाणात गव्हाची निर्यात होऊ लागली आहे. अचानक वाढलेल्या मागणीमुळे गव्हाच्या दरात वाढ झाली होती. अजून भाव वाढतील असे बोलले जात होते. मात्र, यंदा गव्हाचे उत्पादन चांगले असून सरकारी गोदामांमध्येही मोठा साठा शिल्लक आहे. येत्या काही दिवसात पावसाने हजेरी न लावल्यास गव्हाच्या भावात किंचित घसरण अथवा स्थिर राहण्याचे संकेत व्यापाऱ्यांनी दिले. तूर डाळ, हरभरा डाळीचे भाव वाढलेल्या स्थितीत स्थिरावलेले आहे. आता उन्हाळी धान्याची खरेदी वाढलेली आहे. गव्हाच्या भावात किंचित घट झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com