व्यापार क्षेत्र ‘व्हेंटिलेटर’वर; बाधित वाढल्याने लग्नसराईचा व्यवसाय बुडाला

परिस्थिती लवकर नियंत्रणात न आल्यास अर्थव्यवस्थेला सुरुंग लागण्याची शक्यता आहे.
 Marriage
Marriagesakal media

नागपूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्ण वाढू लागल्याने बाजारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या पंधरा दिवसात ६० ते ७० टक्के व्यवसाय प्रभावित झाला. दिवाळीनंतर व्यवसाय पूर्वपदावर येत असताना तिसऱ्या लाटेने पुन्हा व्यवसायाची चाके रुळावरून घसरली. आता परिस्थिती लवकर नियंत्रणात न आल्यास अर्थव्यवस्थेला सुरुंग लागण्याची शक्यता आहे.

 Marriage
नागपूर : लोकांच्या सांगण्यावरून गुंतवणूक नकोच

टाळेबंदीनंतर दसरा-दिवाळीच्या काळात बाजारात मागणी वाढल्याने दोन वर्षातील नुकसान काही प्रमाणात भरून निघत होते. मात्र हा आनंद क्षणभंगूर ठरला. सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्यांच्या काळात बाधितांची संख्या एक आकडी होती. तिसरी लाट येणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात असल्याने व्यापाऱ्यांनी बंपर खरेदी केली. मात्र, डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना रुग्णवाढीचा आलेख वाढतच आहे. सध्या दररोजची रुग्णसंख्या पाच हजारांच्या जवळपास पोहोचली. त्या पार्श्वभूमीवर लग्न समांरभासह उत्सवावर निर्बंध लागू करण्यात आले. त्यामुळे बाजारातील गर्दी कमी झाली असून, ग्राहकांमध्ये भीती आहे. परिणामी, ग्राहकांनी घराबाहेर पडणे कमी केले आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे.

 Marriage
ग्रामीण भागात शौचालयांचा वापर बैलांचा चारा, अडगळीचे साहित्य ठेवण्यासाठी; कधी थांबणार लोटा परेड?

दिवाळीनंतर बाजारात खरेदीचा उत्साह होता. हा सिझन चांगला जाईल अशी आशा निर्माण झाली होती. जानेवारी महिन्यात लग्नसोहळे मोठ्या प्रमाणात होते. सर्वच व्यापाऱ्यांमध्ये उत्साह होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांनी मालाची मागणी केली होती. निर्बंध नसले तरी ग्राहकांमध्ये भीती वाढली आहे. त्यामुळे बाजारातील ग्राहकांची वर्दळ मंदावली आहे. बाहेरगावावरून येणारे व्यापारी अथवा ग्राहकांची संख्याही रोडावली आहे. त्याचा फटका बाजारातील उलाढालीवर झाला. सरकारकडून अद्याप कोणतीही आर्थिक मदत व्यापाऱ्यांना झालेली नाही.

-अशोक संघवी, अध्यक्ष, नागपूर जनरल मर्चंट असोसिएशन

ओमिक्रॉनचा व्हेरियंट अतिशय सौम्य आहे. पॅसासिटेमॉल गोळी घेऊन तीन ते चार दिवसात रुग्ण ठणठणीत होत आहेत. मात्र, निर्बंध आणि टाळेबंदीची भीती वाढल्याने २५ ते ३० टक्के व्यापार प्रभावित झालेला आहे. अशीच स्थिती राहिल्यास भविष्यात व्यापारासह अर्थव्यवस्थाही डबघाईस येण्याची शक्यता आहे.

-दीपेन अग्रवाल, अध्यक्ष, कॅमेट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com