विदर्भावर शोककळा: स्वातंत्र्यदिनाची मौज जीवावर बेतली; आठ युवकांना जलसमाधी

विदर्भावर शोककळा: स्वातंत्र्यदिनाची मौज जीवावर बेतली; आठ युवकांना जलसमाधी

नागपूर : स्वातंत्र्यदिनाच्या सुटीची मजा घेण्यासाठी पर्यटनस्थळी गेलेल्या सात तरुणांचा रविवारी (ता. १५) विविध ठिकाणी पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटना चिखलदऱ्यातील जत्राडोह, पवनीतील कालवा, पाथरी येथील कालवा, तसेच पीरबाबा नदीचा डोहात घडल्या. तर एक युवक सोमवारी (ता. १६) शिवपूजेसाठी कावड भरताना गोंदिया जिल्ह्यातील बाघ नदीत बुडाला.

चंद्रपूर जिल्हा

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील पाथरी येथील गोसेखुर्दच्या कालव्यात बुडून सूरज नेवारे (वय २०, रा. पाथरी) आणि सोनू सोरते (वय २५ रा. बामणी, जि. गडचिरोली) या दोन युवकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना स्वातंत्र्यदिनी दुपारी घडली. पाथरी गावाजवळून जाणाऱ्या कालव्याचे काम सध्या सुरू आहे. कोरोनामुळे असोलामेंढा पर्यटन बंद असल्याने या परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे.

विदर्भावर शोककळा: स्वातंत्र्यदिनाची मौज जीवावर बेतली; आठ युवकांना जलसमाधी
आमदार भुयार यांना शिक्षा; तहसीलदारांना मारला होता माईक फेकून

सूरज आणि सोनू दोघेही पोलिसांची नजर चुकवून पोहण्यासाठी कालव्याकडे गेले. आठ फूट खोल असलेल्या कालव्यात प्रवाह जास्त असल्याने सोनू गटांगळ्या खाऊ लागला. त्याला वाचवण्यासाठी सूरजने पाण्यात उडी घेतली. तो सोनूला बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत असतानाच पोलिस तेथे पोहोचले. त्यांनीही दोघांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले व दोघांचाही बुडून मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीकरिता सावलीच्या ग्रामीण रुग्णालयात आणले.

जिल्हा भंडारा

भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात सेल्फीच्या नादात दोन सख्ख्या भावांचा गोसेखुर्द धरणालगतच्या कालव्यात पडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास घडली. मंगेश मधुकर जुनघरे (वय ३७) व विनोद मधुकर जुनघरे (वय ३५) ही मृत भावांची नावे असून दोघेही उमरेड (जि. नागपूर) येथील रेवतकर ले-आऊटमध्ये राहतात.

विदर्भावर शोककळा: स्वातंत्र्यदिनाची मौज जीवावर बेतली; आठ युवकांना जलसमाधी
मुलांच्या जाण्याने आई-वडिलांनी तर पतीच्या जाण्याने बायकांनी फोडला टाहो

स्वातंत्र्यदिनानिमित्त मंगेश व विनोद हे दोघे भाऊ पाच मित्रांसह गोसेखुर्द धरण पाहण्यासाठी दुचाकीने आले होते. सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास कालव्यालगत सर्व मित्र सेल्फी काढत होते. सेल्फी काढत असतानाच मंगेशचा तोल गेला आणि पाण्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी लहान भाऊ विनोदने पाण्यात उडी घेतली. परंतु, तोसुद्धा पाण्यात बुडाला. २० तासांच्या शोधानंतर दोघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले.

जिल्हा अमरावती

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे स्वातंत्र्यदिनी फिरायला आलेल्या अकोला येथील दोन युवकांचा जत्राडोहात बुडून मृत्यू झाला. दुसऱ्या एका घटनेत खटकाली येथील डोहात आंघोळीसाठी उतरलेल्या अंजनगाव तालुक्यातील चौसाळा येथील युवकाचा बुडून मृत्यू झाला. या दोन्ही घटना रविवारी दुपारी घडल्या.

अकोल्यातील अकोट फैल येथे राहणाऱ्या शेख इकरम शेख हुसेन कुरेशी (वय २६) व शेख आजीम शेख सकुर (वय २७) हे दोघे नऊ मित्रांसह चिखलदरा येथे फिरायला आले होते. ते सर्व मित्र जत्राडोह पॉइंटवरील धबधब्याखालील डोहात उतरले. खोल पाण्यात गेल्याने इकरम व अजीम या दोघांचा बुडून मृत्यू झाला.

दुसऱ्या एका अन्य घटनेत चिखलदरा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पोपटखेडा-खटकाली मार्गावरील पीरबाबा नदीच्या डोहात आंघोळीसाठी उतरलेल्या हरीश जानराव काळमेघ (३८, रा. चौसाळा, ता. अंजनगाव) या युवकाचा बुडून मृत्यू झाला. त्याचा मृतदेह रविवारी काढण्यात आला.

विदर्भावर शोककळा: स्वातंत्र्यदिनाची मौज जीवावर बेतली; आठ युवकांना जलसमाधी
विदर्भातील पहिला जिजामाता सहकारी साखर कारखाना सुरू होणार?

जिल्हा गोंदिया

गोंदिया जिल्ह्यातील रजेगाव येथील बाघ नदीच्या पात्रात कावडमध्ये पाणी भरत असताना पाय घसरून नदीत पडल्याने युवकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता. १६) सकाळी घडली. प्रमोद वंजारी (वय ३६, रा. रजेगाव) असे मृताचे नाव आहे. श्रावण महिन्याच्या सोमवारी मोठ्या संख्येने कावड यात्रेकरू रजेगाव येथे बाघ नदी परिसरात येतात व तेथून कावड आणून शिव मंदिरात अभिषेक करतात. त्यानुसार प्रमोदही सोमवारी कावड आणण्यास गेला होता. स्थानिक गोताखोरांच्या मदतीने शोध घेऊन दुपारी त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com