नागपूर : पोटासाठी आंबे उत्पादक शेतकरी रस्त्यावर

हापूस व अल्फोन्सोची भूक गावरानवर, ग्राहकही खूश
Nagpur Mango growers farmers struggle to selling
Nagpur Mango growers farmers struggle to sellingsakal

नागपूर : चार -दोन पैसे जास्त मिळावेत, या उद्देशाने ग्रामीण भागातील अनेक शेतकरी सध्या शहराकडे धाव घेऊन गावरान आंबे विकत असल्याचे चित्र जागोजागी पाहायला मिळत आहे. कॉटन मार्केट किंवा कळमना बाजारापेक्षा रस्त्यावर चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी आनंदात आहे. त्याचवेळी आवाक्याबाहेर असलेल्या महागड्या हापूस व अल्फोन्सोची भूक स्वस्त व चविष्ट गावरान आंब्यावर भागविली जात असल्याने नागपूरकरही खुश आहेत.

शहरात कॉटन मार्केट आणि कळमना बाजार फळांचे मोठे मार्केट आहे. मात्र या ठिकाणी दलाली, हमाली, टॅक्स, वाहतूक व अन्य खर्च अधिक येत असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यामुळे अनेकांनी भर रस्त्यावर आंबे विकण्याचा पर्याय निवडला आहे. सिव्हिल लाइन्समधील जपानी गार्डन परिसर सध्या या शेतकऱ्यांचे कमाईचे स्थळ बनले आहे. शहरालगतच्या कळमेश्वर, येरला, भारसवाडा, धापेवाडा, सावनेर, देवलापार, कन्हानपासून अगदी शंभर किमी दूर अंतरावर राहणारे नरखेडपर्यंतचे अनेक शेतकरी दररोज सायकल व दुचाकीने पायपीट करत सकाळपासून रात्री उशिरापर्यंत उन्हातान्हात रस्त्यांवर गावरान आंबे विकताना दिसत आहेत.

यासंदर्भात ‘सकाळ’ ने काही आंबे उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या असता ते म्हणाले, कॉटन मार्केट व कळमना बाजार आम्हाला दूर पडतो. शिवाय तिथे दलाली, हमाली व अन्य टॅक्ससह वाहतूक खर्चही भरपूर येतो. त्यामुळे सरतेशेवटी हाती खूपच कमी पैसे पडतात. त्यापेक्षा रस्त्यावर उभे राहून चार-दोन पैसे जर अधिक मिळत असतील तर त्यात गैर काहीही नाही. मालक आणि ग्राहक यांचा थेट संबंध येत असल्यामुळे कोणताही अतिरिक्त खर्च येत नाही. त्यामुळे आंबे दहा-पाच रुपयांनी स्वस्त विकले तरीही चांगली कमाई होते. शिवाय ग्राहकांनाही कमी पैशात चविष्ट गावरान आंबे खायला मिळत आहेत. तसेही हापूस आणि अल्फोन्सो जातीचे आंबे महागडे असून, गोरगरिबांसह मध्यमवर्गीयांच्याही आवाक्याबाहेरचे आहेत. त्यामुळे इच्छा असूनही हे आंबे खरेदी करण्याची सहसा हिंमत होत नाही. अशा परिस्थितीत अनेक जण गावरान आंब्यांवर हापूसची भूक भागवित आहेत.

दुप्पट व तिपटीने नफा

काही शेतकरी गावातील दुसऱ्या शेतकऱ्यांकडील कच्चे आंबे स्वस्तात खरेदी करून ते तणसात पिकू घालतात. चार-पाच दिवसांत ३० ते ४० रुपये किलोने घेतलेल्या आंब्याला नागपुरात ८० ते १०० रुपये सहज मिळतात. त्यामुळे नफाही दुप्पट व तिपटीने मिळत असल्याचे एका शेतकऱ्याने सांगितले.

मी व माझे सहकारी दररोज दुचाकीने नागपुरात येऊन रात्री नऊ-दहापर्यंत गावरान आंबे विकतो. उशीर झाला की रात्री नातेवाईकांकडे मुक्काम करतो. सध्या चांगला भाव मिळत असल्याने कमाईही बऱ्यापैकी होत आहे.

-गडेजी पांडे, आंबेविक्रेते शेतकरी (देवलापार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com