नागपूर : आता पिके वाचविण्यासाठी आटापिटा

काही दिवस पाऊस न पडल्यास पिके कोमजण्याची भीती
Nagpur no rainfall farmer crop damage
Nagpur no rainfall farmer crop damagesakal

जलालखेडा : नरखेड तालुक्यात पावसाने मृग नक्षत्रात दमदार हजेरी लावली नसली तरी मात्र दोन तीन पाणी झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली. सद्यास्थितीत पिके बहरली आहेत; मात्र गत आठवडाभरापासून पाऊस नसल्याने पिके कोमेजण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पिके वाचविण्यासाठी शेतकरी पिकांना पाणी देत आहेत. आणखी दोन ते तीन दिवस पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.

सध्या शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. ग्रामीण भागात चांगला पाऊस झाला नसला तरी काही शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली. दरम्यान, पिके उमलली असून, पिकांना पाण्याची गरज आहे. अशातच पावसाने दडी मारल्याने पिके कोमेजण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाला असून पीक वाचविण्यासाठी तो आटापिटा करीत आहे. यावर्षी नरखेड तालुक्यात कपाशी व तुरीचा पेरा वाढला आहे. सोयाबीन सह इतर पिकांचे क्षेत्र घटणार असल्याचे चित्र आहे.

तालुक्यात यंदा ४७ हजार हेक्टर क्षेत्र वहितीखाली असून, सोयाबीनची पेरणी ५०० हजार ५०० हेक्टर, कपाशी २८ हजार ४४५ हेक्टर, तूर ७ हजार ५०० हेक्टर, उडीद व मूग व इतर पिके ६ हजार हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज तालुका कृषी विभागाने वर्तविला आहे. मात्र यापैकी जवळपास ४० टक्के पेरणी आटोपली आहे. नरखेड तालुक्यातील काही मंडळ वगळता जलालखेडा, मेंढला मंडळातील क्षेत्रामध्ये अत्यल्प पाऊस झाला आहे. पावसाच्या आशेने अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे; मात्र पावसाने दडी मारल्याने पिके धोक्यात सापडली आहेत. जलालखेडा मंडळात तर आतापर्यंत फक्त ८० मिमी पाऊस पडला आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढविण्याची शक्यता आहे. पिके वाचविण्यासाठी शेतकरी स्प्रिंकलरद्वारे पाणी देत आहेत. सद्यस्थितीत शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत .

घरी ठेवलेले सिंचन साहित्य पुन्हा शेतात

रब्बी हंगामात सिंचनासाठी वापरण्यात येणारे सिंचन साहित्य अवघ्या दीड महिन्यापूर्वीच शेतकऱ्यांनी घरी आणून गुंडाळून ठेवले. आता पावसाने दडी मारल्याने पिके संकटात सापडली आहेत. त्यामुळे घरी आणून ठेवलेले सिंचन साहित्य पुन्हा शेतात नेण्याची धडपड शेतकऱ्यांनी सुरू केली असून, ठिबक सिंचन संच, तुषार सिंचन संच बैलगाडीने शेतात नेण्यात येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com