नागपूर : ‘ब्रेक फेल’ झाल्याने स्कूलबस रस्त्याच्या कडेला

दुचाकीस्वार दोन विद्यार्थी जखमी
Nagpur School bus brake fail road accident
Nagpur School bus brake fail road accidentsakal

हिंगणा : ‘ब्रेक फेल’ झाल्याने स्कूलबस अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या फुटपाथवर घुसली. यात दुचाकीस्वार दोन विद्यार्थी जखमी झाले. फुटपाथवर असलेल्या दुकानांचे सुद्धा नुकसान झाले. हा अपघात शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास हिंगणा मार्गावर वानाडोंगरी येथील वायसीसीई कॉलेजसमोर घडला. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

वानाडोंगरी स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळेची ही स्कुल बस (एमएच ३१, सीबी३५८१) ही शाळेतून खाली उतरत असतांना अचानक या बसचे ‘ब्रेक फेल’ झाले व ती अनियंत्रित झाली. त्यामुळे चालक प्रवीण शामराव लडके ( वय३५, वैशाली नगर नागपूर) याने ही बस रस्त्याच्या कडेला नेण्याचा प्रयत्न केला. त्यात एक मोटरसायकल या बससमोर आल्याने त्यावर स्वार वायसीसीई कॉलेजचे दोन विद्यार्थी नवनीत माधव ठाकरे (१९) व मानव राजेंद्र गाठींबांधे ( १९) जखमी झाले. त्यांना तात्काळ शालिनीताई मेघे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याशिवाय रस्त्याच्या कडेला असलेल्या आणखी एका मोटरसायकल व काही नाश्ता टपऱ्यांचे सुद्धा नुकसान झाले. एमआयडीसी पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com