Saree: नागपुरी साडीचे ‘जीआय’ मानांकन अडकले लालफितशाहीत

नागपुरी साडीला (Nagpuri Saree) जीआय मिळाले नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
Nagpuri Saree GI
Nagpuri Saree GISakal

भोसले काळापासून प्रसिद्धीझोतात आलेल्या नागपुरी साडीला भौगोलिक निर्देशन (जीआय) मिळविण्यासाठी महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाने केंद्र सरकारकडे दोन वर्षापूर्वी प्रस्ताव पाठविला. मात्र, तो प्रस्ताव लालफितशाहीत अडकल्याने अद्याप नागपुरी साडीला (Nagpuri Saree) जीआय मिळाले नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

देशाच्या विविध भागातील राजे महाराजे यांच्याकडे या साड्यांची विशेष मागणी होती. रंगसंगती आकर्षक असल्याने अनेकांना या साडीने भूरळ घातली होती. त्या साडीला पुन्हा गतवैभव मिळविण्यासाठी महामंडळाने पुढाकार घेतला आहे. नागपुरी साडीसोबत हिमरु शाली व फॅब्रिक आणि सोलापूरच्या वॉल हॅंगीगला भौगोलिक निर्देशन (Geographical Index) मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. यापूर्वी पैठणी साडी आणि टसर करवती साडीला जीआय मानांकन मिळाले आहे. पैठणी साडीच्या नावाने कोणतीही साडी खपवण्याचे प्रकार सुरू होते. त्यामुळेच या साड्यांना जीआय मानांकन घेण्यात आले आहे. पारंपारिक व्यवसाय करणाऱ्यांच्या कलेला वैभव आणि सोबतच अर्थाजन व्हावे म्हणून जीआय मानांकन प्राप्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, केंद्र सरकारच्या धोरणामुळे हा प्रस्ताव लालफितशाहीत अडकल्याची चर्चा रंगली आहे.

Nagpuri Saree GI
ब्लाउजऐवजी कुर्ती, टॉप अन् जॅकेटवर नेसा साडी! राहा स्टायलिश

भोसले काळात येथील विणकर व्यवसायाची भरभराट झाली. देशाच्या विविध भागातून नागपुरी साड्यांना विशेष मागणी होती. पैठणीचा उगम नागपुरी साडीतून झाल्याचा उल्लेख आहे. पैठणी साडी जशी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तशीच टसर करवती साडीही विदर्भात प्रसिद्ध होती.

नागपुरी साड्या नागपूर, खापा, उमरेड, सावनेर, पवनी आणि भिवापूर या भागात मोठ्या प्रमाणात विणल्या जात होत्या.

जीआयचे महत्त्व-

एखाद्या विशिष्ट भागात उगम असणाऱ्या आणि एकमेवाद्वितीय वैशिष्ट्ये असणाऱ्या उत्पादनांचे वेगळेपण टिकविण्यासाठी भौगोलिक मानांकन (जीआय) देण्याची ही पद्धत आहे. यातून, या उत्पादनांचे वेगळेपण आणि त्याचा दर्जा टिकविण्याची हमी मिळते. यासाठी हे उत्पादन संबंधित विभागाचेच असल्याचे स्पष्ट करावे लागते. भारतामध्ये २००४ मध्ये सर्वांत पहिल्यांदा दार्जिलिंगच्या चहाला हे मानांकन मिळाले होते.

Nagpuri Saree GI
हॅन्डलूम सिल्क साडी अन् अर्थमंत्री निर्मला सीतारमन

नागपुरी कॉटन साडीची वैशिष्ट्ये-

  • पारंपारिक आणि वजनाला हलकी

  • सहा आणि नऊ वारात उपलब्ध

  • ६० व ८० नंबरमध्ये विणण्यात येतात

  • डिझाईन्स प्लेन, चेक्स, बुट्टे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com