टेरेसवरील पार्ट्यांना नागपूर शहरात बंदी

अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त; दारुड्यांची रात्र पोलिस ठाण्यात
terrace party
terrace partySakal

नागपूर : ओमिक्रॉनचा वाढता प्रभाव (Omicron Variant) पाहता शासनाने नवीन नियमांना समोर ठेवत पोलिस आयुक्तांनी आता बाल्कनी, टेरेस आणि छतावरील पार्ट्यांवरही बंदी घातली आहे. कोरोनाच्या नियमांचा भंग केल्यास किंवा कुणी नवीन वर्षांचा उत्साह साजरा करताना उन्माद केल्यास त्याची अख्खी रात्र पोलिस ठाण्यात (Police Station) जाणार असल्याचा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला.

थर्टी फर्स्टला शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून अडीच हजार पोलिसांचा ताफा सज्ज ठेवण्यात आला आहे. शहराच्या सर्वच सीमा सील करण्यात आल्या असून नाक्यांवर सशस्त्र पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले आहे. अमितेशकुमार व पोलिस सहआयुक्त अस्वती दोरजे यांनी गुरुवारी बंदोबस्ताचा आढावा घेतला. त्यानंतर पोलिस आयुक्त निवडक पत्रकारांशी बोलत होते.

terrace party
पुणे : नवीन कोरोना रुग्णांचा आकडा गुरुवारी तीनशेच्या घरात

कुटुंबातील सदस्यांसह घरी नववर्ष साजरे करण्याला कोणतीही हरकत नाही. मात्र अपार्टमेंट व सोसायटीतील पार्ट्यां पूर्णत: बदी असेल. याशिवाय शहरालगतच्या ढाब्यांचीही झाडाझडती सुरू करण्यात आली आहे. अपघात होऊ नये यासाठी पोलिस आयुक्तांनी वाहतूक पोलिसांनीही विशेष सूचना केल्या. रॅश ड्रायव्हिंग आणि स्टंटबाजी करणाऱ्यांवरही पोलिसांची नजर आहे. थर्टी फर्स्ट तसेच न्यू इयर सेलिब्रेशनच्या निमित्ताने जागोजागी पार्टीचे आयोजन केल्या जाते.

टेरेसवरील पार्ट्यांना शहरात बंदी

अतिउत्साहाच्या भरात डीजे लावून नृत्याच्या नावाखाली धिंगाणा केला जातो. गर्दीच्या ठिकाणी महिला-मुलींशी लगट करण्याचा प्रयत्न होतो. त्यातून वाद वाढतात अन् नंतर हाणामारी किंवा प्राणघातक हल्ल्याच्या घटना घडतात. दारूच्या नशेत अनेक जण गोंधळ घालतात.नववर्षाचे स्वागत करताना नागरिकांनी संयम बाळगावा, पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले.

असा आहे बंदोबस्त

  • बंदोबस्तात तैनात अधिकारी व कर्मचारी- २,५०० नाकेबंदी – ७५ ठिकाणी

  • फिक्स पॉइंट- १०० जीप पेट्रोलिंग- १०० बीट मार्शल - १५०

  • गुन्हे शाखा पथक- १२ बॉम्ब शोधन नाशक पथक- ४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com