सहा बाजार समित्यांमधील तूरखरेदीवर नाफेडचा "बॅन'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 एप्रिल 2017

नागपूर - कमी दर्जाची तूरखरेदी करण्यात आल्याच्या कारणावरून "नाफेड'ने अमरावती आणि नांदेड जिल्ह्यांतील प्रत्येकी तीन याप्रमाणे सहा केंद्रांवरील खरेदी थांबविण्याचा आदेश दिला आहे. शेतकऱ्यांचा वाढता रोष पाहता काही बाजार समित्यांनी "नाफेड'शी थेट संपर्क साधत पोलिस बंदोबस्तात खरेदी सुरू केली.

"नाफेड'द्वारा खरेदी करण्यात आलेल्या तुरीची त्यांच्या ग्रेडरमार्फतच तपासणी होते. त्यानंतरच खरेदी होत असतानादेखील अमरावती व नांदेड जिल्ह्यांतील काही केंद्रांवर हलक्‍या प्रतीची तूरखरेदी झाल्याचा खुलासा झाला. "नाफेड'च्या कर्मचाऱ्यांवरील राजकीय दबावातून हे घडल्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. दरम्यान, "नाफेड'ने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार, अचलपूर आणि अंजनगाव या केंद्रांवरील खरेदी बंद केली. त्यासोबतच नांदेड जिल्ह्यातील नांदेड, देगलूर तसेच नायगाव या तीन केंद्रांवरील खरेदी थांबविण्याचे तडकाफडकी आदेश दिले.

Web Title: naphed ban in six market commiittee tur purchasing