...तो शेतकरी परतलाच नाही!

प्रमोद पाटील
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

बाळापूर जवळ रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दोन मोटरसायकलचा समोरासमोर अपघात झाला.

चिचोंडी : ठाणगाव (ता. येवला) येथील शेतकरी शिवाजी तुकाराम शेळके (वय ४८) यांचा काल सायंकाळी झालेल्या मोटरसायकल अपघातात निधन झाले.

पावसाचे वातावरण निर्माण झाल्याने सोंगलेली मका झाकण्यासाठी शेळके हे मनमाड येथे प्लास्टिक कागद आणायला गेले होते. मात्र बाळापूर जवळ रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दोन मोटरसायकलचा समोरासमोर अपघात झाला. त्यामध्ये ते डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाले होते. यातच त्यांच्या डोक्याला मार लागल्याने ते जागेवरच ठार झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, दोन मुले असा परिवार आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: nashik marathi news yevala that farmer never returned