नागलडोह जंगलातून नक्षलवाद्यांचे पलायन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

केशोरी (जि. गोंदिया) - गोंदिया, गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरील नागलडोह जंगलात बुधवारी (ता.25) सकाळी पोलिस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक उडाली. गोंदिया पोलिस दलाच्या सी-60 पथकासमोर हतबल झालेले नक्षलवादी पळून गेल्याचे पोलिस सूत्राने सांगितले. घनदाट जंगलात सकाळीच पन्नासहून अधिक पोलिस आणि 10 ते 15 च्या संख्येत असलेल्या नक्षलवाद्यांमध्ये गोळीबार झाला. त्यानंतर नक्षलवादी पळून गेले. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांनी या घटनेला दुजोरा दिला असून, या घटनेत पथकातील कोणताही पोलिस कर्मचारी जखमी झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.
Web Title: naxalite escape in nagaldoh forest