नयन चव्हाणची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत निवड

nayan
nayan

अकोला : राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या शिबिराकरिता अकोला क्रिकेट क्लबचा अष्टपैलू खेळाडू नयन चव्हाणची निवड करण्यात आली आहे. 

नयन चव्हाणने यापूर्वी १९ वर्षांखालील विदर्भ संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. विदर्भाच्या १४ व १६ वर्षांखाली संघाकडूनही तो खेळला आहे. हिमाचल प्रदेशात उना येथे २३ मे ७ जून २०१८ दरम्यान आयोजित आंतरविभागीय क्रिकेट स्पर्धेत मध्यविभागातून तो खेळला होता. या स्पर्धेत त्याने पाच डावात दोन अर्धशतकासह २५१ धावा केल्यामुळे त्याची राष्ट्रीय क्रिकेट अकादमी शिबिराकरिता निवड झाली. चॅलेंजर ट्राॅफीमध्ये त्याने १९ वर्षांखालील खेळाडूंच्या ब्लू संघाचेसुद्धा प्रतिनिधित्व केले असल्याची माहिती विदर्भ क्रिकेट संघटनेचे जिल्हा संयोजक व अकोला क्रिकेट क्लबचे कर्णधार भरत डिक्कर यांनी दिली. 

नयन चव्हाणच्या यशस्वी कामगिरीकरिता व त्याच्या भावी वाटचालीकरिता अकोला क्रिकेट क्लबचे अध्यक्ष नानूभाई पटेल, उपाध्यक्ष विजय तोष्णीवाल, सचिव विजय देशमुख, सरसचिव कैलाश शहा, दिलीप खत्री, अॅड. मुन्‍ना खान, गोपाळ भिरड, शरद अग्रवाल, माजी कर्णधार विवेक बिजवे, क्रीडा परिषद सदस्य जावेद अली, परिमल कांबळे, रवी ठाकूर, सुमेद डोंगरे, अमित माणिकराव, पवन हलवणे, देवकुमरा मुधोळकर आदींनी काैतुक केले आहे.    

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com