सर्वच राज्यकर्त्यांनी मराठ्यांना चॉकलेट दिले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

नागपूर - मराठा आरक्षणाची मागणी जुनी आहे. कोणत्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना न्याय दिला नाही. फक्त जातीचे राजकारण केले आणि निवडणुकीत वापर केला, असा आरोप करून राज्यकर्तांनी मराठ्यांना चॉकलेट दिले, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नरेंद्र पाटील यांनी विधान परिषदेत केली.

विधान परिषदेत आरक्षणाच्या चर्चेत ते बोलत होते. पंधरा वर्षे आघाडीची सत्ता राज्यात होती. आता युतीची आहे. राज्यात अनेक वर्षे मराठा मुख्यमंत्री होते. त्यांनीही मराठ्यांच्या मागणीकडे गांभीर्याने पाहिले नाही. 1982 पासून आजपर्यंत जातीचे राजकारण होत आहे. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी राणे समितीने मराठा आरक्षणाचा अहवाल आघाडी सरकारकडे सुपूर्त केला होता. तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी तो अहवाल दडपून ठेवला. लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आरक्षण देण्याचा निर्णय घेतला, असा आरोप करून त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही लक्ष्य केले. मराठा समाजाने ऍट्रॉसिटी कायदा रद्द करा, अशी कधीच मागणी केली नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावर पाटील यांनी आक्षेप घेतला.

विदर्भ

नागपूर -  सरासरीपेक्षा अधिक तीन तास विक्रमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील अनेक वस्त्या जलमय झाल्या. नदी-नाले दुथडी भरून वाहत...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017

वर्धा - कारंजा तालुक्यातील सेलगाव येथील राहत्या घरी कपाटला अचानक विजेचा प्रवाह उतरल्याने त्याच्या झटका बसून आईसह चिमुकलीचा...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017

अकोला : सन २०१२ नंतर देशामध्ये सर्वच राज्यात जुलै २०१७ मध्ये पंचवार्षीक पशुगणना होणे अपेक्षीत होते. मात्र, केंद्राचे अनुदान आणि...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017