मराठा आरक्षण वाद तातडीने मिटवावा - आठवले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 ऑक्टोबर 2016

चंद्रपूर - मराठा समाजाकडून राज्यभर मोर्चे काढले जात आहेत. हे जनतेचे आंदोलन आहे. या समाजाची आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यात यावी. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने पुढाकार घेऊन हा वाद तातडीने मिटवावा, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे केले. दीक्षाभूमी येथील धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन कार्यक्रमासाठी ते चंद्रपूर येथे आले असता, विश्रामगृहात ते पत्रकारांशी बोलत होते. 

आठवले म्हणाले, ""मराठा आरक्षणाला आपला विरोध नाही. ऍट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कायद्यात बदल करण्याची मागणी मराठा समाजाकडून होत आहे. हा विषय आपल्या मंत्रालयाशी निगडित आहे. त्यामुळे कायद्यात दुरुस्ती करण्यासंदर्भात यथायोग्य निर्णय घेतला जाईल; मात्र, ऍट्रॉसिटी कायदा कोणत्याही परिस्थितीत रद्द केला जाणार नाही. अत्याचार करणाऱ्या आरोपींवर निश्‍चितपणे कारवाई झाली पाहिजे; मात्र, केवळ द्वेषभावनेतून कुणाचीही नावे टाकून या कायद्याचा गैरवापर होऊ नये.‘‘ 

देशात पटेल, मराठा, जाट, राजपूत आणि इतरही समाजांकडून आरक्षणाची मागणी होत आहे. त्यामुळे आरक्षण 50 टक्‍क्‍यांवरून ते 75 टक्के करावे. त्यानंतर या समाजांना आरक्षण दिले जावे, असे त्यांनी सूचित केले. 

दलित-मराठा ऐक्‍य परिषद येत्या 11 नोव्हेंबरला कोल्हापूर येथे घेण्यात येणार आहे. कोल्हापूरला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. या भूमीतील शाहू महाराज, सयाजी गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शैक्षणिक मदत केली. त्यामुळे या भूमीत परिषद घेण्याचे ठरविल्याचे आठवले यांनी सांगितले.