थॅलेसेमिया घेऊन जन्मतात दरवर्षी १२ हजार चिमुकले

thalassemia
thalassemia

नागपूर - थॅलेसेमिया रक्ताचा आनुवंशिक आजार आहे. यात रक्‍तातील हिमोग्लोबीन कमी होते. औषधोपचाराने तो बरा होता नाही. देशात दरवर्षी १२ हजारांवर थॅलेसेमियाग्रस्त बाळ जन्माला येतात. देशात ४० लाख थॅलेसेमियाग्रस्त आहेत. उपराजधानीत थॅलेसेमियाग्रस्तांची चाचणी मेयो, मेडिकल मेडिकलमध्ये उपलब्ध नाही. यामुळे रुग्णांना मुंबई, दिल्लीसह देशातील बड्या शहरांचा रस्ता धरावा लागतो. मेयो-मेडिकलमध्ये थॅलेसेमियाग्रस्तांची नोंददेखील होत नसल्याचे समजते. 

थॅलेसेमियाचे ‘मायनर’, ‘मेजर’ आणि ‘इंटर मीडिया’ असे प्रकार आहेत. मेजर स्वरूपातील थॅलेसेमियाग्रस्तांचे जगणे म्हणजे आयुष्यभर यातना सहन कराव्या लागतात. पंधरा दिवस किंवा दरमहा शरीरातील ‘रक्त’ बदलणे हाच त्यांच्या जगण्याचा पर्याय आहे. देशात तीन कोटी थॅलेसेमियाचे वाहक आहेत. तर लाखावर रुग्ण थॅलेसेमियाच्या वेदना घेऊन जगत आहेत. 

विदर्भात शरीरातील रक्त बदलणाऱ्या थॅलेसेमियाग्रस्तांची संख्या सहाशेवर तर तीनशेवर थॅलेसेमियाग्रस्त चिमुकले नागपूर जिल्ह्यात आहेत. याशिवाय ‘मायनर’ थॅलेसेमिया हा लोकसंख्येच्या चार टक्के मुलांमध्ये आढळतो, असे प्रसिद्ध थॅलेसेमिया तज्ज्ञ डॉ. विंकी रुघवानी यांनी सांगितले. थॅलेसेमिया ओळखण्यासाठी ‘हाय प्रोलाइन लिक्विड क्रोमॅटोग्राफी’ चाचणी मेयो रुग्णालयात करता येऊ शकते. यामुळे नागपूर जिल्ह्यातील नव्हे तर मध्य भारतात थॅलेसेमिया रुग्णांची नोंद दोन्ही वैद्यकीय महाविद्यालयात होऊ शकते. 

थॅलेसेमिया टाळण्यासाठी विवाहपूर्व चाचणी
थॅलेसेमियाग्रस्तांची संख्या वाढत आहे. परंतु, यांची नोंद नाही. आई-वडील जेव्हा थॅलेसेमियाचे वाहक (मानयर) असतात. तेव्हा प्रत्येक गर्भवती मातेच्या पोटात मेजर थॅलेसेमियाग्रस्त मूल जन्माला येण्याची दाट शक्‍यता असते. यामुळे विवाहपूर्व चाचणी करण्यासाठी मेयो, मेडिकलसह सर्वच वैद्यकीय महाविद्यालयांत ‘एचपीएलसी’ यंत्रावर थॅलेसेमिया चाचणी करावी. जेणेकरून थॅलेसेमियाग्रस्त जन्मावर नियंत्रण मिळवता येईल, असे डॉ. विकी रुघवानी म्हणाले.

लक्षणे
रोगप्रतिकारशक्ती कमी होणे
सांधे निष्क्रिय होणे
डोळ्यांना त्रास होणे
रेटिना खराब होणे
यकृत, किडनीचा त्रास

थॅलेसेमिया आजारातून मुक्तीसाठी ‘अस्थिमज्जा प्रतिरोपण’ (बोन मॅरो) हा पर्याय आहे. परंतु, यासाठी १० ते १२ लाख रुपयांचा खर्च लागतो. स्टेम सेल थेरपीतून यावर उपचार शक्‍य आहेत. शरीराची एकंदर रचना गुणसूत्रांवर ठरते. प्रत्येकाच्या शरीरात क्रोमोझोनच्या जोड्या असतात. त्यातल्या व्या क्रोमोझोनमध्ये बीटा ग्लोबीनचे आणि व्या क्रोमोझोनमध्ये अल्फा ग्लोबीनचे संतुलन बिघडले की सिकलसेल, थॅलेसेमिया आजार जडतो. मेडिकल टर्मिनॉलॉजित याला हिमोग्लोबिनोपॅथीज डिसऑर्डर म्हणतात. हा पूर्णपणे अनुवांशिक आजार आहे. खानपान, बॅक्‍टेरिया, व्हायरसशी त्याचा सूतराम संबंध नसतो.
- डॉ. विंकी रुघवानी, थॅलेसेमिया तज्ज्ञ, नागपूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com