फडणवीस मुख्यमंत्री, की बॅंकेचे मॅनेजर? - नीतेश राणे 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 एप्रिल 2017

वाशीम - "युती सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. नोटाबंदीनंतर शेतमालाचे भाव गडगडल्याने शेतकरी घायकुतीला आला आहे; मात्र कर्जमाफीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्जमाफीने बॅंका डबघाईस येतील, असे वक्तव्य करत असल्याने ते मुख्यमंत्री आहेत, की बॅंकेचे मॅनेजर,' अशी घणाघाती टीका कॉंग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी शुक्रवारी केली. 

आमदारांचे निलंबन, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, रिपब्लिकन पक्ष (क), एमआयएम, संभाजी ब्रिगेड, शेतकरी कामगार पक्ष व इतरही विरोधी पक्षांच्या वतीने राज्यभर संघर्ष यात्रा काढली आहे. आज कारंजामार्गे मालेगाव व नंतर वाशीम येथे यात्रेचे आगमन झाले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार जितेंद्र आव्हाड, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आबू आझमी, जयंत पाटील, आमदार राहुल बोंद्रे, अमित झनक, सुनील केदार, माजी खासदार अनंतराव देशमुख यांची उपस्थिती होती. राणे यांनी या वेळी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा चांगलाच समाचार घेतला. येथून ही यात्रा हिंगोलीकडे रवाना झाली. 

सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर - चव्हाण 
युती सरकारने खोटी आश्‍वासने देऊन सत्ता मिळविली आहे. आता आश्‍वासने पूर्ण करण्याची वेळ आली असताना सरकार लबाडपणा करत आहे. युती सरकार सत्तेवर आल्यापासून शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. मुख्यमंत्री शेतीचे उत्पादन वाढविण्याच्या गोष्टी करतात; मात्र आता तुरीचे उत्पन्न वाढले तर या सरकारने आयातीला खुली सूट देऊन तुरीचे भाव पाडले आहेत. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. 

Web Title: Nitesh Rane Congress MLA has criticized