नितीन गडकरी आता सिमेंटवरून डांबरी रस्त्यावर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जुलै 2018

नागपूर - राज्यात व देशात सिमेंट रस्त्यांसाठी आग्रही असलेले केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी पुन्हा डांबरी रस्ते बांधण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सूतोवाच त्यांनी आज एका कार्यक्रमात केले. 

अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या इमारतीचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. या वेळी बोलताना त्यांनी पुन्हा डांबरी रस्ते बांधणे सोयीस्कर असल्याचे स्पष्ट केले. काही वर्षांपूर्वी गडकरी यांनी डांबरी रस्ते हे भ्रष्टाचाराचे कुरण असल्याचे सांगून सिमेंटच्या रस्त्यांचा आग्रह धरला होता. त्यानंतर राज्यभर सिमेंट रस्ते बांधण्याचा सपाटा सुरू केला होता. 

डांबरी रस्त्यांमधील गैरव्यवहार आळा घालण्यासाठी त्यांनी सिमेंट रस्त्यांचे धोरण तयार केले. देशभरात सिमेंट रस्त्यांचे जाळे विणण्यात आले. सिमेंट रस्त्यांना 20-25 वर्षे काहीच होत नाही, असा दावा त्यांच्याकडून करण्यात आला होता. 

चार वर्षांपूर्वी राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर सिमेंटचे रस्ते होण्याचे प्रमाण पुन्हा वाढले; परंतु या रस्त्यांचा दर्जा अत्यंत खराब राहिल्याने नागपुरातील अनेक सिमेंटचे रस्ते उखडून गेले आहेत. यासंदर्भात जनमंच संस्थेने पाहणी केल्यानंतर स्वतः गडकरी यांनी या रस्त्यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. सिमेंट कंपन्यांकडून अरेरावी होत असल्याने पुन्हा डांबरी रस्ते तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या डांबरी रस्त्यांमध्ये प्लॅस्टिक आणि रबराचाही उपयोग करण्यात येईल. निरुपोयोगी प्लॅस्टिकचा उपयोग रस्त्यात करण्यासाठी आधीच शासनाने मंजुरी दिल्याचेही त्यांनी सांगितले. 

Web Title: Nitin Gadkari to take the initiative to build the tar road