शासकीय रुग्णालयात रुग्ण करताहेत पाणीपाणी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

यवतमाळ - वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात गेल्या महिनाभरापासून सुरू झालेली पाणीटंचाई आता अधिकच तीव्र होत आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने रुग्णांना पाणीपाणी करावे लागत आहे. पाण्याअभावी शस्त्रक्रियेत खोळंबा होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

शहरवासींची तहान भागविण्यासाठी बेंबळा प्रकल्पाचे पाणी आणण्याचे काम सुरू आहे. हे पाणी मे महिन्यात येणार की नाही, याबाबत मतभिन्नता आहे. नागरिकांची ओरड कमी करण्यासाठी टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, शासकीय रुग्णालयात पाणीबाणी उद्‌भवली असताना जिल्हा प्रशासनाचे अद्यापही लक्ष गेलेले दिसत नाही. 

Web Title: no drinking water in government hospital