कमिशन वाढवा, अन्यथा "नो पर्चेस डे'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

नागपूर - कमिशन वाढवून देण्याबद्दल सरकारकडून अद्याप कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने पेट्रोल पंप मालकांनी 10 मे हा दिवस "नो पर्चेस डे' ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या पेट्रोल पंपांकडून कोणतीही सुटी घेतली जात नाही. मात्र, केंद्र सरकारकडून कमिशन वाढवून दिले जात नसल्याने रविवारी साप्ताहिक सुटी घेण्याचा इशारा देशभरातील पेट्रोल पंप मालकांनी दिला आहे.

पीएसयू संस्थांकडून मिळणाऱ्या कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी, अशी मागणी जानेवारी महिन्यातच केली होती. त्यासाठी संपावर जाण्याचा इशारा दिला होता. आश्वासन मिळाल्यानंतर संप मागे घेण्यात आला. पण, अद्याप कमिशनमध्ये वाढ झाली नाही. कमिशनमध्ये वाढ न केल्यास 10 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलची खरेदी केली जाणार नाही, असा इशारा पेट्रोल पंप मालकांनी दिला आहे. 14 मे रोजी रविवार असल्याने पेट्रोल पंपांवरील कर्मचाऱ्यांना सुटी देण्यात येईल आणि यानंतरच्या प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद असतील. 15 मे पासून पेट्रोल पंप फक्त एकाच शिफ्टमध्ये (सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा) सुरू असतील, असे विदर्भ पेट्रोल डिलर्स संघटनेचे सचिव प्रणय पराते यांनी सांगितले.