नोटाबंदीने तापले राजकारण 

ban note-politics
ban note-politics

नागपूर - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटाबंदीवरून राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. भाजपच्या विरोधात सर्वच पक्ष एकत्रित आले आहेत. नागपूरमध्ये कॉंग्रेसने नोटाबंदीविरुद्ध जनाक्रोश पदायात्रा काढली तर दुसरीकडे नोटाबंदीच्या समर्थनार्थ भाजपच्या व्यापारी आघाडीने समर्थन यात्रा काढून यास सर्व व्यावसायिकांचा पाठिंबा असल्याचे दर्शविण्याचा प्रयत्न केला. माकपने नोटाबंदीच्या विरोधात कमाल चौकात निदर्शने केली. 

नोटाबंदीविरुद्ध कॉंग्रेसचा जनआक्रोश
नागपूर - पंतप्रधानांनी कुठलीही पूर्वतयारी न करता अचानक केलेली नोटाबंदी, त्यामुळे सर्वसामान्यांची झालेली गैरसोय तसेच व्यावसायिकांचे होत असलेले नुकसान, याकडे लक्ष वेधण्यासाठी कॉंग्रेसच्या वतीने पदयात्रा काढून जनाक्रोश व्यक्त करण्यात आला.

पाचशे व हजार रुपयांच्या नोटाबंदीने संपूर्ण देशातील व्यवसाय ठप्प झाला. सुटे पैसे नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. लग्नसमारंभात अडचणी येत आहेत. शेतमजूर, भाजीविक्रेते, मजुरी करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. कामधंदे सोडून नागरिकांना बॅंकेसमोर रांगेत तासन्‌तास उभे राहावे लागत असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. झिरो मॉईल चौकातून पदयात्रा काढण्यात आली. व्हेरायटी चौक, कॉटन मार्केट चौक, शनिमंदिर, जानकी टॉकीज, झाशी राणी चौक आदी मार्गांनी काढलेल्या पदयात्रेचा समारोप व्हेरायटी चौकातील गांधी पुतळ्याजवळ करण्यात आला.

शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात झिरो माईल चौकातून पदयात्रा काढण्यात आली. यात माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री अनीस अहमद, ऍड. अभिजित वंजारी, विशाल मुत्तेमवार, नितीन कुंभलकर, अशोक धवड, यादवराव देवगडे, अतुल लोंढे, रामगोविंद खोब्रागडे, प्रज्ञा बडवाईक, राजू व्यास, डॉ. गजराज हटेवार, बंडोपंत टेंभूर्णे, संदेश सिंगलकर, जयंत लुटे, रत्नाकर जयपूरकर, दिनेश बावाबाकोडे, विजय बाभरे, वीणा बेलगे, हरीश खंडाईत, अनिल शर्मा, अशोक यावले, अक्षय समर्थ, किशोर गीद, राजेश कडू, प्रशांत आस्कर, विलास गावंडे, दिनेश तराळ, पंकज थोरात, किशोर मेंघरे, पंकज निघोट, घनश्‍याम मांगे, राजकुमार कमनानी, युगल किशोर, प्रकाश बांते, श्रीकांत ढोलके, दीपक वानखेडे, नगरसेवक प्रशांत धवड, संजय महाकाळकर, अरुण डवरे, संजय सरायकर, देवा उसरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले.

नोटाबंदीच्या समर्थनार्थ भाजपची धन्यवाद रॅली
कॉंग्रेसच्या जनआक्रोशला विरोध व पंतप्रधानांच्या नोटाबंदीला समर्थन करण्यासाठी सोमवारी भाजपच्या वतीने धन्यवाद रॅली काढण्यात आली. यात इतवारीतील व्यापारी तसेच कामगार रिक्षेवाले सहभागी झाले होते.

भाजपची व्यापार आघाडी यांच्या पुढकाराने इतवारीतील मस्कासाथ चौकातून रॅली काढण्यात आली. शहीद चौक, भंडारा रोड, तीननल चौक, भांडे बाजार, भारतमाता चौक आदी मार्गाने मस्कासाथ येथील महापालिकेच्या इमारतीसमोर सांगता करण्यात आली. मार्गावरील दुकानदार व व्यापाऱ्यांना गुलाबाचे पुष्प भेट देण्यात आले. काळ्या पैशाच्या विरोधात पंतप्रधानांनी केलेल्या नोटाबंदीला सहकार्य करीत असल्याने त्यांचे आभार मानण्यात आले.

रॅलीत शहर महामंत्री किशोर पलांदुरकर, प्रसिद्धीप्रमुख चंदन गोस्वामी, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष संजय वाधवानी, व्यापारी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष महेंद्र कटारिया, अमोल ठाकरे, रामभाऊ अंबुलकर, अजय अग्रवाल, प्रताप मोटवानी, रामवतार अग्रवाल, भगवान भंसाली, कमलेश नागपाल, अशोक शनिवारे, राहुल गुप्ता, श्‍याम बजाज, जवाहर चुग, गज्जू महाजन, विश्‍वबंधू गुप्ता, लखीराम परसनानी, अशोक वाधवानी, भरत शाह, प्रकाश डागा, राजेश मुनियार, देवीचंद रखेजा, राजू दास्यानी, अजय सुगंध, दिलीप सोमयानी, महेश कुकरेजा, संदेश कनोजे, विनय जैन, विनोद जुमानी, दीपक कमवानी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com