ओला, उबेर टॅक्‍सींवर कारवाईसत्र

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 सप्टेंबर 2016

नागपूर - ऑनलाइन प्रवासी वाहतूक सेवा उपलब्ध करून देणाऱ्या ओला, उबेर व अन्य टॅक्‍सीविरुद्ध कारवाईची धडक मोहीम प्रादेशिक परिवहन विभागाने हाती घेतली आहे. याअंतर्गत आतापर्यंत 12 टॅक्‍सीचालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यातील पाच टॅक्‍सी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. 

उपराजधानीत ओला, उबेरसह अन्य ऑनलाइन कंपन्यांच्या सुमारे अडीच हजार टॅक्‍सी धावत आहेत. या सेवेला अद्याप अधिकृत मान्यता नाही. शिवाय लांबून ओळखू येण्यासाठी वाहनाला वेगळा रंग लावला जातो. पुढे मागे नावाच्या पाट्याही लिहिल्या जातात. हा प्रकार आरटीओच्या नियमांचे उल्लंघन आहे. नियमानुसार टॅक्‍सीवर कोणत्याही कंपनीचे नाव लिहिता येत नाही. चालकाने गणवेश घालणे अपेक्षित आहे. नियमांचा भंग करून टॅक्‍सी चालत असल्याचा ठपका ठेवत कारवाईची मोहीम गेल्या चार दिवसांपासून सुरू करण्यात आली आहे. सोमवारपर्यंत सुमारे 50 टॅक्‍सींची तपासणी करण्यात आली. त्यातील 12 वाहनचालकांना मेमो देण्यात आला. मेमो देऊनही आवश्‍यक सुधारणा न करणाऱ्या पाच टॅक्‍सी ताब्यात घेण्यात आल्या. सर्व वाहनचालकांकडून 15 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
 
विदर्भ टॅक्‍सीचालक संघटनेने या कारवाईला विरोध दर्शविला आहे. स्वस्त, सुविधाजनक, सुरक्षित सेवा देणाऱ्या टॅक्‍सीचालकांवरील कारवाई अन्यायकारक आहे. आरटीओने विनापरवाना ऑटोचालकांवर कारवाई करावी, अशी संघटनेची मागणी आहे.