अवघे 65 रुग्ण भरती 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

नागपूर - धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयातील निवासी डॉक्‍टरला मारहाण केल्याच्या निषेधार्थ उपराजधानीतील 700 निवासी डॉक्‍टरांनी सुरक्षेसाठी "मास बंक' पुकारला. दुसऱ्या दिवशीही मेडिकल, मेयोतील सर्वच निवासी डॉक्‍टर रजेवर असल्याने रुग्णसेवा कोलमडली. आज अवघे 65 रुग्ण विविध वॉर्डात भरती झाले. कॅज्युल्टीत 14 रुग्ण भरती झाल्याची माहिती पुढे आली. 

मेडिकलमध्ये बाह्यरुग्ण विभागात रोज तीन हजार रुग्णांची नोंद होते. ही संख्या दिवसेंदिवस रोडावत आहे. रुग्ण इंटर्नस्‌ आणि परिचारिकांच्या भरोशावर आहेत. ट्रॉमा केअर युनिटमध्ये सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळात केवळ 1 शस्त्रक्रिया झाली. मेडिकलच्या ओटी "ए' मध्ये रोज मोतीबिंदूच्या 20 शस्त्रक्रिया होतात. त्यात प्रचंड घट झाली असून, केवळ 3 शस्त्रक्रिया झाल्या. इएनटी विभागात 4 , तर आर्थो विभागातही 4 किरकोळ शस्त्रक्रिया झाल्या. मेडिकलच्या प्रसूतीशास्त्र विभागात दर दिवसाला 25 शस्त्रक्रिया होतात, त्या ओटी "जी' मध्ये केवळ 5 प्रसूतीच्या शस्त्रक्रिया झाल्या. मेयो रुग्णालयाची स्थिती याहून वेगळी नाही. मेयोतील नेत्ररोग विभागात शस्त्रक्रिया होत नसल्याची माहिती आहे. प्रसूतीच्या तीन शस्त्रक्रियांसह सर्वच विभागाच्या केवळ 12 किरकोळ शस्त्रक्रिया पार पडल्या. नियोजित असलेल्या सर्वच शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 

वरिष्ठ डॉक्‍टरही दिसेनात... 
निवासी डॉक्‍टर संपावर जातात. त्यावेळी मेडिकलमधील सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक तसेच प्राध्यापक रुग्णसेवेसाठी पुढे येतात, असे अधिष्ठाता कक्षातून सांगण्यात येते. परंतु, मेडिकल आणि मेयोमध्ये वरिष्ठ डॉक्‍टर सकाळी साडेदहा वाजून गेल्यानंतरही बाह्यरुग्ण विभागात पोहोचले नव्हते. 

दंतच्या निवासी डॉक्‍टरांचा पाठिंबा 
निवासी डॉक्‍टरांना होणाऱ्या मारहाणीचा निषेध करीत शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील निवासी डॉक्‍टर तसेच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील वरिष्ठ निवासी डॉक्‍टरांनीही मेडिकल आणि मेयोतील निवासी डॉक्‍टरांच्या सामूहिक रजा आंदोलनाला पाठिंबा दिला. 

Web Title: Only 65 patients recruited