नाग नदी सौंदर्यीकरणाला विरोध

महाल ः नाग नदी सौंदर्यीकरणामुळे विस्थापित होणाऱ्या नागरिकांसोबत निदर्शने करताना राष्ट्रवादीचे गटनेते दुनेश्‍वर पेठे, जय जवान जय किसान संघटनेचे प्रशांत पवार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अनिल अहीरकर व इतर.
महाल ः नाग नदी सौंदर्यीकरणामुळे विस्थापित होणाऱ्या नागरिकांसोबत निदर्शने करताना राष्ट्रवादीचे गटनेते दुनेश्‍वर पेठे, जय जवान जय किसान संघटनेचे प्रशांत पवार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अनिल अहीरकर व इतर.

नाग नदी सौंदर्यीकरणाला विरोध
नागपूर : नाग नदी किनाऱ्याच्या दोन्ही बाजूंची प्रत्येकी 15 मीटर जागा आरक्षित करण्याच्या प्रस्तावाविरोधात या परिसरातील रहिवासी नागरिकांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस, जय जवान, जय किसान संघटनेने सभागृहावर धडक दिली. नागरिकांचा विरोध बघता सभागृहाने हा प्रस्ताव स्थापत्य समितीकडे अभ्यासासाठी पाठविला.
पालिका सभागृहात नाग नदी सौंदर्यीकरणासाठी जागा आरक्षित करण्याचा प्रस्ताव असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मनपातील गटनेते दुनेश्‍वर पेठे, जय जवान, जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्याक आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहमद, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अनिल अहीरकर यांच्या नेतृत्वात मोर्चा सभागृहावर धडकला. या वेळी पेठे, पवार यांनी महापौरांना निवेदनाद्वारे, या प्रस्तावामुळे 1 लाख गरीब नागरिक बेघर होणार असल्याने या प्रस्तावाला विरोध असल्याचे सांगितले. 15 हजार घरे विस्थापित होणार असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस आंदोलन करणार, असा इशाराही त्यांनी दिला. अखेर सभागृहाने हा प्रस्ताव स्थापत्य समितीकडे अभ्यासासाठी पाठविला. संपूर्ण अभ्यासानंतर हा प्रस्ताव आता पुन्हा सभागृहात आणला जाणार आहे. ही समिती केंद्र, राज्य सरकारचे पुनर्वसनाबाबत सर्व नियम तपासणार आहे. प्रकल्पात नाग नदीसोबत पिवळी नदी आणि बोर नाला शुद्धीकरणाचा समावेश करण्यात आला आहे. एकूण 1 हजार 252 कोटींचा हा प्रकल्प आहे. यापैकी 85 टक्के रक्कम अर्थात 1064.48 कोटी कर्ज स्वरूपात घेण्यात येणार असून, जपान सरकारकडून ते उभारण्यात येणार आहे. यासाठी जपान सरकारनेही हिरवा कंदील दाखविला आहे. प्रकल्पाच्या 15 टक्के अर्थात 187 कोटी रक्कम ही नागपूर महापालिकेला द्यावी लागणार आहे. आंदोलनात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पूर्व नागपूर अध्यक्ष रवींद्र इटकेलवार अमरिश ढेरे, रियाज शेख, विलास पैठणकर यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते.
प्रकल्पाचे सादरीकरण करणार
या प्रकल्पाला होणारा विरोध लक्षात घेता महापौर नंदा जिचकार यांनी सादरीकरण करण्याची गरज व्यक्त केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नदीकाठावरील नागरिकांचे प्रथम पुनर्वसन केले जाईल, असे स्पष्ट केले आहे. त्यानुसार पुनर्वसन केले जाईल, असे सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com