वाशी फाटा येथे उड्डाण पुल उभारण्यासाठी सर्वपक्षीय आंदोलन

file photo
file photo

वाशी (जि. उस्मानाबाद): सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या वाशी फाटा येथे उड्डाण पुल उभारण्यासाठी सर्वपक्षीय आंदोलन उभारणार असल्याची माहिती जिल्हा काँग्रेस कमेटिचे उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रशांत चेडे यांनी दिली आहे. वाशी फाटा येथे उड्डाण पूल न उभारल्यास या ठिकाणी सुरु असलेले रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सर्वपक्षीय एकञ येवून बंद पाडण्याचा इशारा प्रशांत चेडे यांनी दिला आहे.

सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सध्या वेगात सुरु आहे. हा राष्ट्रीय महामार्ग वाशी तालुक्यातून जात असून, वाशी येथून अवघ्या तीन किलोमिटर अंतरावर असलेल्या वाशी फाटा येथून हा महामार्ग जातो. वाशी हे तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे विविध शासकिय कार्यालये आहेत. तालुक्याचे ठिकाण असल्याने येथील बाजारपेठ मोठी आहे. शासकिय कार्यालयातील विविध कामासाठी तसेच बाजारपेठेतील आपल्या दैनदिन व्यवहारासाठी शहरात येणा-या नागरीकांची संख्या मोठी आहे. माञ, वाशी फाटा येथे मंजूर असलेला उड्डान पुल महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करत असलेल्या संबधीत कंपनीकडून रद्द करण्यात आल्याची चर्चा परिसरात आहे. वाशी फाटा येथून वाशी शहराकडे येणा-या वाहनचालकांची संख्या लक्षात घेता या ठिकाणी भविष्यात अपघातांची समस्या मोठी वाढणार आहे.

वाशी येथे असलेल्या भैरवनाथ शिवशक्ती सहकारी साखर कारखाना येथे जाण्यासाठी उस वाहातून करणा-या विविध वाहाणाना वाशीफाटा येथूनच जावे लागते तसेच तालुक्यात असणा-या बहुसंख्य गावांना उस्मानाबाद किंवा औरंगाबाद कडे जाण्यासाठी वाशीफाटा येथूनच राष्ट्रीय महामार्ग ओलांडुन जावे लागणार आहे. राष्ट्रीय महामार्गावर भविष्यात होणारी मोठ्या प्रमाणातील वाहातून लक्षात घेता वाशीफाटा येथे महामार्ग ओलांडुन शहरात येणा-या किंवा शहरातून बाहेरगावी जाणा-या नागरीकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.

येथील नगर पंचायतीने १६ फेब्रुवारी २०१८ रोजी जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना निवेदन देऊन वाशीफाटा येथे उड्डान पुलाची उभारणी करण्याची मागणी केलेली आहे. त्याचप्रमाणे वाशीफाटा येथे प्रवाशांच्या सुरेक्षेच्या दृष्टीने उड्डानपुल होणे आवश्यक असल्याची चर्चा परिसरात जोरात सुरु आहे. २२ फेब्रुवारी २०१७ रोजी येथील नगर पंचायतीच्या सर्वसाधारण सभेत या संबधीत चर्चा होवुन तसा सर्वानुमते ठराव मंजुर करण्यात आलेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com