थकीत 10 कोटी, वसुली फक्त 25 लाख 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मार्च 2017

नागपूर - गुप्ता कोलच्या संचालकांनी सेल टॅक्‍स थकविल्यामुळे त्यांची मालमत्ता जप्त करून 10 कोटींपैकी फक्त 25 लाखच वसूल केल्याने जिल्हा प्रशासनाच्या कारवाईवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. 

नागपूर - गुप्ता कोलच्या संचालकांनी सेल टॅक्‍स थकविल्यामुळे त्यांची मालमत्ता जप्त करून 10 कोटींपैकी फक्त 25 लाखच वसूल केल्याने जिल्हा प्रशासनाच्या कारवाईवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. 

गुप्ता यांचा केरळमध्ये व्यवसाय असल्याचे सांगण्यात येते. त्यांनी केरळ राज्यातील इरनाकुलम जिल्ह्यातील 10 कोटी 15 लाख 48 हजारांचा सेल टॅक्‍स थकविला. ही थकीत रक्कम वसूल करण्यासाठी इरनाकुलमचे जिल्हाधिकारी यांनी नागपूर जिल्हाधिकारी यांना महसुली वसुली प्रमाणपत्र (आरआरसी) दिले. त्यानुसार टेम्पल रोड, सिव्हिल लाइन्स येथील गुप्ता टावर येथील चौथ्या माळ्यावरील गुप्ता कोल यांच्या नावे असलेली जंगम मालमत्ता करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी गेले. दरम्यान, गुप्ता यांनी 25 लाखांचा धनादेश दिला. त्यामुळे जप्तीची कारवाई न करता कर्मचारी परतले. गुप्ता कार्पोरेट ट्रीब्युनलकडे यांच्या विरोधात अपील करणार आहे. त्यामुळे जप्तीची कारवाई टाळण्यात आली. ट्रीब्युलनमध्ये जाण्यास संधी देण्यासाठी जप्तीची कारवाई टाळण्यात आल्याचे आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी तीन लोकांच्या मालमत्तांवर जिल्हा प्रशासनाकडून जप्तीची कारवाई करण्यात आली.