"ओव्हरलोड' वाहतुकीमुळे रस्ते खराब

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 ऑगस्ट 2016

नागपूर - कंत्राटदारांनी निकृष्ट साहित्याचा वापर केल्याने रस्ते खराब झाल्याचा आरोप होत असून, चौकशी समितीही गठित करण्यात आली आहे. परंतु, हे रस्ते ओव्हरलोड वाहतुकीमुळे खराब झाल्याचा निष्कर्ष पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढला. दुसरीकडे, महापालिकेच्या चौकशी समितीचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. 

सहा महिन्यांपूर्वी तयार केलेल्या रस्त्यांवरील गिट्टी निघाली. ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास होत आहे. अपघात झाले. कंत्राटदारांनी निकृष्ट साहित्याचा वापर केला असून, कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे. मनपाच्या सभागृहातही यावर गदरोळ झाला. स्वतः स्थायी समिती अध्यक्ष बंडू राऊत यांच्यासह सत्ताधाऱ्यांनीही रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे मान्य केले होते. त्यानंतर रस्त्यांच्या चौकशीसाठी समिती गठित करण्यात आली. नुकतेच शिवसेनेने निकृष्ट रस्त्यांसाठी दोषी असलेल्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी केली. 

यावर पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, शहरातील रस्त्यांची क्षमता 20 टनांची असून, 40 ते 50 टन क्षमतेची वाहतूक होत आहे. त्यामुळे रस्ते उखडत आहेत. मेट्रो, सिमेंट रस्ते आदी विकासकामे होत आहेत. त्यामुळे जड वाहतूक होत आहे. तीन वर्षे विकासकाम चालणार असून, त्रास सहन करावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: "Overload" bad traffic roads