गवना येथील शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 डिसेंबर 2017

पारशिवनी - तालुक्‍यातील गवना (गरंडा) येथील एका युवक शेतकऱ्याने शनिवारी (ता. नऊ) शेतात सततच्या नापिकी व कर्जाच्या ओझ्यामुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

गवना (गरंडा) येथील सुधाकर कृष्णा घारड (वय ३५) असे मृत युवक शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे ५ एकर शेती असून घरी आईवडील, दोन मुले व पत्नी आहे. सततची नापिकी, पिकाला पडलेला बाजारभाव व बॅंकेचे तसेच इतरांकडून उधार घेतलेल्या कर्जाला कंटाळून या युवा शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासांत उघडकीस झाले. याबाबत पारशिवनी पोलिस तपास करीत आहेत.

Web Title: parshivani nagpur news farmer suicide