"पार्टी फंडा'च्या भाराने इच्छुक धास्तावले 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व हजारच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय महापालिकेची निवडणूक लढण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी पेच निर्माण करणारा ठरला आहे. सर्वच पक्षात पार्टी फंड नावाची तिजोरी असून, अधिकाधिक रक्कम देणाऱ्याला उमेदवारी, असे समीकरण आहे. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर एका पक्षाने पार्टी फंडात दुपटीने वाढ केल्याचे समजते. त्यामुळे अनेकांचा "भेजाफ्राय' झाला आहे. 

नोटा बंद करण्याचा फटका विशेषतः राजकीय पक्षाच्या तिजोरीला बसला आहे. हा पैसा म्हणजे बेहिशेबी मालमत्तेचे उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे पार्टी फंडासाठी एका पक्षाने इच्छुकांकडून दुप्पट रक्कम घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इच्छुकांत नाराजीचा सूर आहे. सध्या पैशांची चणचण आहे. पुढील दोन महिने विशेष बदल होण्याची अपेक्षा नसताना पक्षाकडून अशी अपेक्षाच कशी केली जाते, असा प्रश्‍न प्रमुख पक्षाच्या कार्यकर्त्याने उपस्थित केला. 
निवडणुकीसाठी तीन महिन्यांत पैसा उभारायचा कुठून, असा प्रश्‍न असतानाच आता पार्टी फंडात भरीव वाढ होणार असल्याच्या चिंतेने अनेकांची झोप उडाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे केंद्र शासनाच्या निर्णयाचा परिणाम फक्त उत्तर प्रदेश किंवा पंजाबच्याच निवडणुकीवर नाही, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर होणार आहे.