पथनाट्यातून मांडल्या महिलांच्या व्यथा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

नागपूर - स्त्री-भ्रूणहत्या, मुलगा व मुलीमध्ये घरात आणि समाजात होणार भेद, स्त्री अत्याचाराच्या घटना, महिलांची होणारी घुसमट आदींचे वास्तवरूपी चित्र विद्यार्थ्यांनी  पथनाट्याच्या माध्यमातून मांडले. कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या वास्तविक दर्शनाने उपस्थितांची मने जिंकून घेतली.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त महिला  सक्षमीकरणावर विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. कुटुंब आणि समाजात वावरताना महिलांनाच प्रत्येक ठिकाणी माघार घ्यावी लागते. मात्र, प्रत्येकवेळी महिलांनीच माघार का घ्यावी. त्यांचे स्वतंत्र अस्तित्व असून, त्यांची होणारी घुसमट दूर व्हावी. याच विषयाला अनुसरून विद्यार्थिनींनी ‘क्‍यो कमे हम कॉम्परमाईज’ हे पथनाट्य सादर केले.

विद्यार्थिनींनी सुरुवातीला महाविद्यालयाच्या परिसरात पथनाट्य सादर केले. या वेळी सहयोगी अधिष्ठाता डॉ. एन. डी. पार्लावार उपस्थित होते.
महिला सक्षमीकरणाच्या विषयावर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उत्कृष्ट पथनाट्याचे पार्लावार यांनी कौतुक केले. त्यानंतर महिला सक्षमीकरणाचा संदेश समाजातील सर्वच स्तरापर्यंत पोहोचावा, यासाठी शहरातील व्हेरायटी चौक, ट्राफिक पार्क, फुटाळा तलाव येथे पथनाट्य सादर केले. 

मुलगा व मुलीमध्ये भेदभाव करू नका मुलींना सन्मानाने वागवा, महिलांचा आदर करण्याचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला. 

पथनाट्यामध्ये धीरज राठोड, शिवाणी पेटकर, प्राची कटघरे, स्मृती पखाळे, रीया नागदिवे, नेहा हुसकुले, प्रतीक चुंभळे, पंकज कमाने, सुमित वाघमारे, पवन कावळकर, मनमोहन कापगते, उमेश कापगते, अजय तारडे, विद्याधर बोरकर यांचा समावेश होता. आयोजनासाठी प्रा. विलास तेलगोटे, डॉ. विष्णुकांत टेकाळे, डॉ. हरीश सवई, डॉ. विजय खवले यांनी सहकार्य केले.

Web Title: Pathanatya pose the women's suffering