रणरणत्या उन्हात चंद्रपुरात निघाला मराठा मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 ऑक्टोबर 2016

चंद्रपूरः रणरणत्या उन्हात शेकडो नागरीकांनी आज (बुधवार) मराठा क्रांती मूक मोर्चात सहभाग नोंदवला. हातात मागण्यांचे फलक आणि अत्यंत शिस्तबद्धपणे निघालेल्या मोर्चाचा समारोप चांदा क्लब मैदानावर झाला. 

दुपारी साडे बारा वाजता म्हाडा वसाहतीतील मैदानावरून मोर्चाला सुरूवात झाली. मोर्चाच्या सुरुवातीला हाती भगवे झेंडे घेतलेल्या महिला आणि विद्यार्थ्यींनी होत्या. "एक मराठा, लाख मराठा‘, "जय जिजाऊ, जय शिवाजी‘, "धर्म मराठा, कर्म मराठा‘, अशा घोषणांचे फलक घेतलेले भगव्या टोप्या घातलेले आणि भगवे झेंडे घेतलेले मराठा समाजबांधव अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चात सहभागी झाले होते.

दुपारी साडे बारा वाजता संत कौलराव म्हाडा वसाहतीतील मैदानातून मोर्चाला सुरूवात झाली. चांदा क्लब मैदानावर समारोप झाला. स्त्रियांचा मोठा सहभाग होता. कोपर्डी प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा, "ऍट्रॉसिटी‘ कायद्यात सुधारणा, डॉ. स्वामीनाथन यांच्या अहवालाची अंमलबजावणी, मराठा समाजाला आरक्षण या मागण्यांकडे मोर्चेकऱ्यांनी सरकारचे लक्ष वेधले.