अस्वलाच्या हल्ल्यांत दोन महिलांसह पाच जखमी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 मार्च 2017

चिखली (जि. अकोला) - अस्वल हल्ल्याच्या वेगवेगळ्या तीन घटनांमध्ये दोन महिलांसह पाच जण जखमी झाले. तालुक्‍यातील करणखेड, महिमळ व करवंड शिवारात शनिवारी दुपारी हे प्रकार घडले. जखमींवर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तालुक्‍यातील करणखेड आणि महिमळ येथील शेतकरी पूर्वहंगामी मशागतीची कामे करत होते. सकाळी साडेअकराच्या सुमारास महिमळ शिवारातील शेतामध्ये अस्वलाने हल्ला चढविला. यामध्ये गजानन आत्माराम येवले (45) अरुण जगन्नाथ येवले (35) आणि पूनम श्‍यामराव मंजा (35 रा. नागझरी) जखमी झाले. याच अस्वलाने जवळच्या करणखेड शिवारामध्ये सुगंधाबाई आसाराम गावंडे (75) या वृद्ध शेतकरी महिलेवर आणि गजानन परसराम जाधव (28 रा. करवंड) या युवकावर हल्ला करून त्यांनाही जखमी केले.