'नागपूरला फार्मा हब करणार'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

नागपूर - नागपूर हे शहर भौगोलिकदृष्ट्या वाहतुकीसाठी सोयीचे आहे. येथे मिहान आणि इतर परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. पायाभूत सुविधा, दळणवळणाची साधने व उद्योगवाढीसाठी पोषक वातावरण असल्याने औषध निर्माण क्षेत्रातील व्यावसायिकांना चांगली संधी आहे. त्यांनी नागपुरात गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

मुंबईतील सह्याद्री अतिथी गृह येथे झालेल्या औषध निर्माण क्षेत्रातील गुंतवणूक संधी या विषयावरील कार्यक्रमात ते बोलत होते.  यावेळी  विविध औषध निर्माण करणा-या कंपन्यांसोबत सुमारे १३ हजार कोटी रुपयांचे सामजस्य करार करण्यात आले. 

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, नागपूर हे देशातील महत्वाचे औद्योगिक शहर म्हणून विकसित होत आहे. इथे उद्योग उभारणीसाठी आवश्‍यक जागा, पाणी आणि वीज मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. नागपूरला फार्मा हब बनविण्यासाठी आवश्‍यक त्या सर्व परवानग्या आणि सुविधा उपल्ब्ध करून देण्यात येतील. निर्मितीसह निर्यातीतील वाटा उचलण्यासाठीही नागपूर शहर सज्ज आहे. रेल वाहतूक, रस्ते वाहतूक, हवाई वाहतूक यांच्यासह नागपूर जवळील ड्राय पोर्टचा उपयोग करुन देशांतर्गत आणि देशाबाहेर औषधी पुरविणे सुलभ होणार आहे. या भागात असलेल्या फार्मास्युटीकल महाविद्यालयातून दर्जेदार उत्पादनासाठी लागणारे मनुष्यबळ देखील मुबलक उपलब्ध होणार आहे. 

५४ हजार कोटींची विकासकामे - गडकरी 
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे सुमारे ५४ हजार कोटी रुपयांचे विकास कामे सुरु असल्याचे सांगितले. भंडारा, सावनेर व इतर जवळपासच्या भागांना ब्रॉडगेज मेट्रोने जोडण्यात येणार आहे. येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन रात्री परदेशात जाणा-या विमानातून डोहा,दुबई, अबुधाबी येथे फळे, भाज्या निर्यात केल्या जातात. यापुढे मदर डेअरीची उत्पादने पाठविण्यास सुरुवात करणार आहे. नागपूर येथे उद्योग उभारल्यास आपत्कालीन परिस्थितीत लागणारी औषधांची निर्यात करणे कमी खर्चात होऊ शकेल.

Web Title: Pharma hub to Nagpur