​दीक्षाभूमीतील बौद्ध स्तुपात पंतप्रधानांनी केले ध्यान

टीम ई सकाळ
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

पंतप्रधानांच्या हस्ते भीम ऍपचा शुभारंभ 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी नागपूरमध्ये भीम आधार सेवेचा शुभारंभ झाला.

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी नागपूरमध्ये भीम आधार सेवेचा शुभारंभ झाला. डिजीधन मेळाव्यात दीक्षाभूमी टपाल तिकिट तसेच पंतप्रधान आवास योजनेच्या पहिल्या टप्प्याचाही शुभारंभ यावेळी पंतप्रधांनच्या हस्ते झाले. तत्पूर्वी पंतप्रधानांनी दीक्षाभूमीचे दर्शन घेतले. येथील बौद्ध स्तुपात पाच मिनिटे ध्यान साधना केली. 

मोदी यांचे शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर वायुसेनेच्या विशेष विमानाने आगमन झाले.

 

यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ परिवहन, जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार अजय संचेती, खासदार डॉ. विकास महात्मे, खासदार रामदास तडस, महापौर श्रीमती नंदाताई जिचकार, जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती निशा सावरकर, आमदार प्रा. अनिल सोले, आ. गिरीष व्यास, आ. प्रणय फुके, आ. सुधाकर देशमुख, आ. मल्लिकार्जुन रेड्डी, आ. विकास कुंभारे, आ. कृष्णा खोपडे, आ. आशिष देशमुख, आ. समीर मेघे, पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी त्यांचे स्वागत केले. 

Web Title: PM narendra modi meditated at dikshabhumi