पोलिसांवर बंदोबस्ताचा वाढला ताण

Police
Police

नागपूर - राज्यातील होमगार्ड जवानांनी गणेशोत्सवातील बंदोबस्तावर बहिष्कार घातल्यामुळे पोलिस विभाग अडचणीत सापडला आहे. होमगार्डअभावी पोलिसांवरील  बंदोबस्ताचा ताण वाढल्याने कायदा व सुव्यवस्था प्रभावित झाली आहे. परिणामी, तपास आणि गस्तीसाठी पोलिस बळ अपुरे पडत असल्याने शहरातील गुन्हेगारीत वाढ झाल्याचे उघड झाले आहे. 

राज्यात गणेशोत्सवापासून खऱ्या पोलिस बंदोबस्ताची परीक्षा असते. मात्र, होमगार्ड जवानांची  साथ नसल्याने बंदोबस्ताचा ताण पोलिसांवर वाढला आहे. होमगार्डच्या न्याय मागण्या मान्य होत नसल्यामुळे होमगार्डनी बंदोबस्तावर बहिष्कार घातला आहे. याबाबत ‘सकाळ’ने वृत्त मालिका प्रकाशित करून होमगार्डचा लढा उभारला आहे. 

याचा फटका पोलिस दलाला बसला. पुणे, मुंबई, नागपूर, अकोला, औरंगाबाद या शहरात तर होमगार्ड जवान नसल्यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्था प्रभावित झाली आहे. नागपुरात गेल्या पाच दिवसांत पाच खुनी हल्ले झाले तर तर दोघांचा खून झाला. पोलिस कर्मचारी गणेश बंदोबस्तात व्यस्त आहेत. त्यामुळे गस्तीवर पोलिस कर्मचारी कमी पडत आहेत. पोलिसांना सध्या होमागार्डची उणीव प्रकर्षाने जाणवू लागली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी पोलिसांनी एनसीसी कॅटेड आणि रस्ता सुरक्षा पथक (आरएसपी) यांना बंदोबस्तासाठी घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, तो प्रस्ताव शाळा-महाविद्यालय आणि पालकांनी धुडकावून लावल्याची चर्चा आहे. त्यामुळे पोलिस एकाकी पडले असून त्याचा परिणाम शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर होत आहे.

तपासापेक्षा बंदोबस्तावर भर
पोलिस कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांसोबत तपास कामी बाहेर जायचे असते किंवा तपासात मदत करायची असते. मात्र, बंदोबस्तात कर्मचारी वाढविल्यामुळे तपासकामाला खीळ बसली आहे. अधिकारी एकटे पडले आहेत तर कर्मचारी बंदोबस्ताचा ताण सहन करावा लागत आहे. 

एनसीसी कर्नल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बंदोबस्तासंदर्भात चर्चा सुरू आहे. एनसीसीचे कॅटेड बंदोबस्तासाठी मिळण्याची शक्‍यता आहे. होमगार्डचा पर्याय म्हणून आम्ही विद्यार्थ्यांच्या एनसीसी पथकाच्या सहकार्याच्या प्रतीक्षेत आहोत. 
- एस. निर्मला देवी, पोलिस उपायुक्‍त, विशेष शाखा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com