मोमिनपुऱ्यात पोलिसांचा ‘कंट्रोल’

नागपूर - मोमिनपुऱ्यात गस्त घालताना तहसीलमधील बिट इंचार्ज पोलिस अधिकारी व कर्मचारी.
नागपूर - मोमिनपुऱ्यात गस्त घालताना तहसीलमधील बिट इंचार्ज पोलिस अधिकारी व कर्मचारी.

नागपूर - शहरातील मध्यभागी असलेल्या तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोमिनपुरा दिवसा-रात्री गजबजलेला परिसर म्हणून ओळखला जातो.

मोमिनपुरा कायम संवेदनशील परिसर आहे. पोलिस आयुक्‍तांनी सुरू केलेल्या बिट प्रणालीमुळे या भागात पोलिसांचे नियंत्रण आहे. चोवीस तास गस्त, शस्त्रधारी पोलिसांची तैनाती, बिट जमादारांचे लक्ष आणि नागरिकांसोबत असलेल्या सुसंवादामुळे मोमिनपुरा बिट शांत आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष खांडेकर  यांच्या नेतृत्वात तहसील पोलिस ठाण्याचा कारभार सुरू आहे. तहसील पोलिस ठाण्याची  स्थापना ७ जानेवारी १९५७ साली झाली.

१. शहीद चौकी बिट
इंचार्ज : प्रशांत नागटिळक 
(सहायक पोलिस निरीक्षक) ,      मो. ८४८४९७७२२५
एकूण कर्मचारी - ८, लोकसंख्या - २५, ०००, गुन्हेगार - १ 
बिटच्या सीमा : निकालस मंदिर, दारोडकर चौक, अग्रेसन चौक, गांजाखेत, तीननल चौक, सराफा लाइन
महत्त्वाची ठिकाणे : सराफा मार्केट, कापड मार्केट, लोहा ओळी, सुदामा गल्ली, पोलिस वसाहत आणि मॅक्‍स बॅंक.

२. बुधवारी बिट
इंचार्ज : विनोद गिरी, 
(सहपोलिस निरीक्षक)
मो. ९८२३८९०४६७
कर्मचारी - १०, गुन्हेगार - ००
लोकसंख्या - ५०,०००
बिटच्या सीमा : मस्कासाथ चौक, गोळीबार चौक, पाचपावली पहिले फाटक, गांजाखेत, पिवळी  मारबत, लालइमली चौक, शहीद चौक.
प्रमुख ठिकाणे : बोहरा मशीद,  बंगाली पंजा, सूत मार्केट

३. टिमकी बीट
इंचार्ज : सुमित परतेकी, 
(सहपोलिस निरीक्षक)
मो. ९९२३५८८७४७
कर्मचारी : ९, गुन्हेगार : १२
लोकसंख्या : ७०,०००
सीमा : भानखेडा रेल्वे लाइन, भगवाघर चौक, गांजाखेत, पाचपावली पहिले फाटक.
प्रमुख ठिकाणे : तकिया दिवानशहा चौक, भानखेडा चौक, हंसापुरी भाग आणि नालसाहब चौक

४. मोमिनपुरा बिट
इंचार्ज : विनोद कडलक,
सहायक पोलिस निरीक्षक, 
मो. ९८२३३९०७६७
कर्मचारी - ११, गुन्हेगार - २०
लोकसंख्या-१ लाख
सीमा :  दोसरभवन चौक, भानखेडा, रेल्वे लाइन-गार्ड लाइन, रामझुला
प्रमुख ठिकाणे : मेयो हॉस्पिटल, मुस्लिम कब्रस्तान, बकरा मंडी-रेल्वे क्‍वॉटर्स, जामा मशीद.

५. सीए बिट
इंचार्ज ः युनूस मुलानी, सहायक पोलिस निरीक्षक,  
मो. ९८८२५८७०८१
कर्मचारी - १०, गुन्हेगार - १०
लोकसंख्या - ५० हजार
सीमा ः दोसरभवन-अग्रेसन चौक-गोळीबार चौक-टीमकी-मोमिनपुरा चौक
प्रमुख ठिकाणे : डागा हॉस्पिटल, सीए मेन मार्केट, सराफा लाइन, खान मशीद

काय आहे बिट सिस्टीम?
प्रत्येक पोलिस ठाण्याची ठरावीक हद्द असते. एका पोलिस ठाण्याअंतर्गत असलेले काही परिसर विभागून तीन ते पाच बिट तयार केले जातात. यात पोलिस अधिकारी आणि कर्मचारी गुन्हे नियंत्रणासाठी कार्यरत असतात. ‘सकाळ’मध्ये प्रत्येक पोलिस ठाण्यातील संपूर्ण बिटमधील ‘ऑन स्पॉट’ माहिती देण्यात येणार आहे. 

पोलिसांसमोरील समस्या
परिसरात वर्दळ असल्याने वाहतुकीची समस्या नेहमीच आहे. त्यामुळे पार्किंगला जागा नाही. बॅग लिफ्टिंग, चेन स्नॅचिंग, किरकोळ वाद, रस्त्यावरील अतिक्रमण, दुकानदारांची अरेरावी आणि हातठेल्यावाल्यांमुळे होणारा ट्रॅफिक जॅम. काही सावजी हॉटेल चालकांचा त्रास आहे.
 

तहसील पोलिस स्टेशनमध्ये पाच बिट 
तहसील पोलिस ठाण्यात ५ बिट आहेत. ठाण्याची सीमा जवळपास आठ ते दहा किलोमीटरची असल्याने बिटमध्ये ४८ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. मोमिनपुरा, भालदारपुरा, गोळीबार चौक, बंगाली पंजा असे काही संवेदनशील परिसर तहसील ठाण्याअंतर्गत येतात. पार्किंगची सर्वांत मोठी समस्या आहे.

मोहल्ला मिटिंग घेतल्या. गस्तीचे प्रमाण वाढवले. जनसंपर्क योग्य ठेवला. मोमिनपुऱ्यात धार्मिक उत्सवापूर्वीच समिती स्थापन करून नियंत्रण करण्यात येते. अनेक दुकानदारांना सीसीटीव्ही तसेच सुरक्षारक्षक नेमण्याच्या सूचना केल्या आहेत. हद्दीतील प्रत्येक गुन्हेगारांच्या ॲक्‍टिव्हीटीवर अप्रत्यक्षरीत्या वॉच ठेवण्यात येत आहे. 
- संतोष खांडेकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, तहसील पोलिस ठाणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com