पोलीसांची पथनाट्यातून जनजागृती

police
police

अकोला : "पोलीसवाल्या दादानं लय बरं केलं गं बया, मले कायद्यानं सद्यान केलं गं बया..! भारुड व अभिनयाच्या माध्यमातून स्त्रीत्व आणि पुरुषपणाच्या पारंपरिक संकल्पना, मुलींबद्दल मुलांचेे वाईट विचार शिवाय मुलगा- मुलगी अशी विभिन्नता यांवर भाष्य करुन जनजागृती केली. 

वासनांध आणि विकृत व्यक्तीकडून बालकांचे लैंगिक शोषण होत आहे. त्यामध्ये जवळचे नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांकडूनही अत्याचार होत असल्याचे उघड होत आहे. महीला, विद्यार्थीनी व लहान मुलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन 12 जुलै ते 22 जुलै दरम्यान पोलीसांचे  विशेष अभियान व त्यानंतर निरंतर जिल्ह्यात महिलांबाबत जनजागृती सुरु आहे.

बालकांच्या लैंगिक संरक्षणासाठी तसेच महिला व वृद्धांच्या संरक्षणासाठी जननी - 2 या उपक्रमा बाबत पोलीस प्रशासनाच्या वतीने बाळापूरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करुन मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी बाळापुर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री.ऐनोदीन खतीब हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते तर प्रमुख अतिथी अपर पोलीस अधिक्षक विजयकांत सागर उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख, सोहेल शेख, डॉ.आशाताई मिरगे,सौ.अरून्धती सिरसाट,नायब तहसिलदार प्रज्ञाताई टाकळे उपस्थित होते. ठाणेदार विनोद ठाकरे मार्गदर्शनाखाली व डॉ. फैयाज हुसेन, अश्वजीत सिरसाट,पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी काम पाहिले. यावेळी परिसरातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थीनी व तसेच महिला व बचतगट महिला यासह पंधराशे महीला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्तावीक उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी तर सूत्रसंचालन डॉ. अलका पत्की तर आभार ठाणेदार विनोद ठाकरे यांनी मानले.

पोलीसांशी मैत्री कराल तर फायदाच होईल
"पोलीसांशी दोस्ती आणि दुश्मनी नको" अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. पोलीसांशी दुश्मनी चांगली नाही, मात्र मैत्री केली तर नक्कीच चांगलं होईल. असे प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com