पोलिसांसोबत सौजन्याने वागा!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 सप्टेंबर 2016

अकोला - गणेशोत्सवादरम्यान दिवसरात्र दहा दिवस बंदोबस्त करणाऱ्या पोलिसांमुळे आपण सुरक्षित असतो. पोलिसांच्या या कर्तव्याला सलाम करून त्यांच्याशी कृतज्ञता व्यक्त करण्याची हीच संधी आहे, अशा आशयाचा संदेश सोशल मीडियावर फिरत आहे. या संदेशाचे अमरावती परिक्षेत्र पोलिस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनीही समर्थन केले आहे.

गणेशोत्सवाच्या काळात अनेकवेळा छोट्या छोट्या कारणावरून अप्रिय घटना घडतात. अशा घटनांनतर पोलिसांवर कमालीचा ताण वाढतो. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्यांना कठोर भूमिका घ्यावी लागते. सर्वत्र शांतता व सुव्यवस्था राहावी, यासाठी सतत राबणाऱ्या पोलिसांविरोधात नेहमीच अपप्रचार होतो. परंतु, त्यांच्या मुत्सद्देगिरीमुळे आपण सुरक्षित आहोत, याची कुणी जाणीव ठेवत नाही. स्वत: जोखीम उचलून प्रत्येक उत्सव शांततेत पार पडावा, यासाठी पोलिस विभाग नेहमीच झटतो. कुठलीही उसंत न घेता पोलिस आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत असतो. तेव्हा पोलिसांचाही सन्मान करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. गणेशोत्सवाच्या बंदोबस्तावर असलेले पोलिसांना शासनाच्या आदेशाचे पालन करावे लागते. त्यांच्या सूचनांना चुकीचे समजून त्यांच्यावर राग काढणे गैरच आहे. शासनाचे कर्मचारी म्हणून ते आपल्यासाठी झटतात. प्रसंगी उपाशी राहून ते कर्तव्य बजावीत असतात. त्यामुळे पोलिसांशी सौजन्याने वागने हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. पोलिस आहेत म्हणून आपण आपले सण आनंदाने साजरे होतात. पोलिसच असुरक्षित राहिले तर आपल्याला रस्त्यावर फिरणेही कठीण होईल. बंदोबस्तादरम्यान पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा संदेश सोशल मीडियावर फिरत आहे.

सोशल मीडियावर फिरणाऱ्या संदेशामधून भावना चांगल्या आहेत. पोलिस समाजासाठी झटत असेल, तर समाजानेही त्यांच्याप्रति कर्तव्य पार पाडले पाहिजे. यातूनच सामाजिक सलोखा कायम ठेवता येतो. 

- विठ्ठल जाधव, पोलिस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र