पोलिसांच्या आरोग्यासह नागरिकांची सुरक्षा

शांतीनगर चौकात वृद्ध, नागरिक आणि दुकानदारांशी संवाद साधताना पोलिस अधिकारी.
शांतीनगर चौकात वृद्ध, नागरिक आणि दुकानदारांशी संवाद साधताना पोलिस अधिकारी.

नागपूर - शांतीनगर पोलिस ठाण्याची निर्मिती केवळ गुन्हेगारांच्या उपद्रवामुळे करण्यात आली. ठाण्याच्या हद्दीत शहरातील सर्वाधिक कुख्यात वसिम चिऱ्या आणि तिरुपती भोगे हे दोन गुन्हेगार आहेत. त्यांची कर्मभूमी ही लकडगंज आणि शांतीनगर आहे. शांतीनगर बगिच्याजवळ या दोन्ही टोळ्यांमध्ये फिल्मीस्टाइल फायरिंग झाली होती. जवळपास दोनशेवर गोळ्या एकमेकांवर या टोळ्यांनी आतापर्यंत झाडल्या. या टोळ्यांचे नेटवर्क नष्ट करण्यासाठी शांतीनगर पोलिसांनी पुरेपूर प्रयत्न केले. आज शांतीनगरात गुंडांचा हैदोस नाही. 

गुन्हेगार आणि टोळ्यांची दहशत शांतीनगरात होती. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शांतीनगर पोलिस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. त्यानुसार पोलिसांच्या खबऱ्यांचे जाळे आणि बिट सिस्टिममुळे गुन्हेगारीवर पूर्णपणे नियंत्रण आहे. ठाण्याची हद्द लहान जरी असली तरी आम्ही सतर्कता नेहमी ठेवतो.
- बाळासाहेब खाडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मो. ९८७०५४०५००

शांतीनगर बिट 
इन्चार्ज- लीलाधर तसरे (सहायक पोलिस निरीक्षक) 
मो. ८४८२९४३६९६
एकूण कर्मचारी - ७ गुन्हेगार ः २६ 
लोकसंख्या - १ लाख २० हजार 

बिटच्या सीमा 
इतवारी रेल्वे स्टेशन ते कावरापेठ रेल्वे क्रॉसिंग, राजीव गांधी नगर ते रामसुमेर बाबा नगर, तुलसीनगर ते मुदलियार चौक

महत्त्वाची ठिकाणे 
महेशनगर, बोहरा कॉलनी, कावरापेठ, इतवारी रेल्वे स्टेशन, मारवाडीनगर, एसआरपीएफ क्‍वॉर्टर्स, बांगडे प्लॉट, हनुमाननगर, तुलसीनगर, मस्के ले-आउट, शांतीनगर गार्डन, बाबा सुमेर नगर, राजीव गांधी नगर. 

लालगंज बिट 
इन्चार्ज - सरिता यादव (पोलिस उपनिरीक्षक) 
मो. ७३५०८५८४७९
कर्मचारी - २२ गुन्हेगार - ४७ 
लोकसंख्या - १ लाख २५ हजार 

बिटच्या सीमा 
कावरापेठ ते दहीबाजार पूल, मेहंदी बाग पूल रेल्वे क्रॉसिंग ते इतवारी रेल्वे स्टेशन

प्रमुख ठिकाणे 
इतवारी, दहीबाजार, मेहंदीबाग, बस्तरवारी, नयापूर, महेशनगर, प्रेमनगर, नारायणपेठ, श्रीरामवाडी, लालगंज, खैरीपुरा, राऊत चौक, बारईपुरा, मस्कासाथ, तेलीपुरा, कुंभारपुरा, गुजरी, दलालपुरा आणि झाडे चौक.

ठाण्याची ओळख
२७ मार्च २०१६ मध्ये शांतीनगर पोलिस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. येथे ६५ पोलिसांचा स्टाफ आहे. यामध्ये एक सहनिरीक्षक तर एक महिला उपनिरीक्षक आहे. ठाणेदार म्हणून अनुभवी बाळासाहेब खाडे आहेत. कर्मचाऱ्यांची संख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी अडचणी येत आहेत.

पोलिसांसमोरील समस्या
ठाण्यात केवळ ६५ कर्मचारी असून, त्यापैकी २० ते २५ कर्मचारी सुटीवर असतात. वारंवार मागणी करूनही कर्मचारी मिळत नाहीत. पोलिस ठाण्यात व्यवस्थित वाहने नाहीत. पॅट्रोलिंग वाहनात केवळ एक चालक आणि एका कर्मचाऱ्यांवर गस्तीची जबाबदारी असते. शांतीनगरात दिवसा घरफोडी होणे, ही सर्वांत मोठी समस्या पोलिसांसमोर आहे. गंभीर स्वरूपाचे गुन्हे जरी नसले तरी घरगुती वाद, चोरी, घरफोडी आणि मारामारी यांसारखे गुन्ह्यांचा भडीमार ठाण्यात असतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com