पोलिसांची दडपशाही?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जानेवारी 2017

नागपूर - गडचिरोली जिल्ह्यातील कथित अत्याचाराची न्यायालयात दाद मागता यावी याकरिता वकिलांना भेटण्यासाठी नागपूरमध्ये आलेल्या चार जणांना गडचिरोली पोलिसांनी वकिलाच्या कार्यालयातच अटक केली. ही घटना शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास झिरो माईल चौकात घडली.

नागपूर - गडचिरोली जिल्ह्यातील कथित अत्याचाराची न्यायालयात दाद मागता यावी याकरिता वकिलांना भेटण्यासाठी नागपूरमध्ये आलेल्या चार जणांना गडचिरोली पोलिसांनी वकिलाच्या कार्यालयातच अटक केली. ही घटना शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास झिरो माईल चौकात घडली.

आपल्या अशिलाला कुठलीही पूर्वसूचना न देता; तसेच कुठलाही गुन्हा दाखल नसताना अटक करून पोलिस दडपशाही करीत असल्याचा आरोप वकील निहालसिंग राठोड यांनी केला. संपूर्ण कारवाई नियमानुसार करण्यात आल्याचे गडचिरोलीचे उपविभागीय अधिकारी सागर कडवे यांचे म्हणणे आहे.

ऍड. निहालसिंग राठोड यांनी सांगितले, छत्तीसगड येथून दोन मुली गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्‍यातील नाईतला गावाकडे येत होत्या. सी-60 च्या जवानांनी दोघींनाही ताब्यात घेतले व रात्रभर डांबून ठेवले. तसेच त्यांच्यावर अत्याचारसुद्धा केला. दुसऱ्या दिवशी दुपारी चारला गट्टा पोलिस ठाण्यात आणले. दोन मुली रात्रभर बेपत्ता असल्याने शेकडो स्थानिक नागरिकांनी पोलिस ठाण्याला घेराव घातला. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही मुलींना मेडिकल तपासणी करण्याकरिता गडचिरोलीच्या जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, तिथे फक्‍त त्यांच्या रक्ताचेच नमुने घेण्यात आले. इतर कोणतीही वैद्यकीय चाचणी करण्यात आली नाही. अत्याचाराचे प्रकरण दडपण्यासाठी पोलिसांनी सोयीस्कर विलंब केला.

पीडित मुलींना शंभर रुपये देऊन छत्तीसगड येथील मूळ गावी पाठविण्यात आले. दोन्ही मुली घाबरल्या होत्या, रडत होत्या. पीडितांच्या नातेवाइकांनी सामाजिक कार्यकर्त्या शीला गट्टा यांना याबाबत माहिती दिली. शीला व पती सैनी गट्टा दोन्ही मुलींना घेऊन शुक्रवारी नागपूरला आले. आज याचिका दाखल करण्यात येणार होती. मात्र, न्यायालयाला सुटी असल्याने ती स्वीकारण्यात आली नाही. शपथपत्र दाखल करण्यासाठी मुलींकडून आवश्‍यक माहिती घेण्यात येत होती. अशात पोलिस धडकले. त्यांनी दोन्ही मुली, शीला व सैनी गट्टा यांना अटक केली, असे ऍड. निहाल सिंग यांनी सांगितले.

पोलिस साध्या वेशात आले होते. त्यांच्यासोबत आणखी काही लोक होते. बळजबरीने चारही जणांना ते घेऊन गेले. त्यांनी कोणताही वॉरंट दाखविला नाही. न्यायालयात प्रकरण सुरू असताना अशिलांना घेऊन जाणे ही न्यायालयीन प्रक्रियेत अडथळा निर्माण करणारे आहे. याची आपण न्यायालयाकडे दाद मागणार असल्याचेही ऍड. राठोड यांनी सांगितले.

कारवाई नियमानुसारच
सैनी आणि शीला गट्‌टा यांच्यावर शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करण्यासंबंधीचा गुन्हा एटापल्ली पोलिस ठाण्यात दाखल आहे. हा गुन्हा अजामीनपात्र आहे. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणात दोन्ही मुली साक्षीदार आहेत. चौकशी आणि सुरक्षेसाठी त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर कोणताही अत्याचार झाला नसल्याचे मेडिकल तपासणीत समोर आले आहे.
- सागर कडवे, उपविभागीय पोलिस अधिकारी, गडचिरोली.

विदर्भ

नागपूर -  सरासरीपेक्षा अधिक तीन तास विक्रमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील अनेक वस्त्या जलमय झाल्या. नदी-नाले दुथडी भरून वाहत...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017

वर्धा - कारंजा तालुक्यातील सेलगाव येथील राहत्या घरी कपाटला अचानक विजेचा प्रवाह उतरल्याने त्याच्या झटका बसून आईसह चिमुकलीचा...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017

अकोला : सन २०१२ नंतर देशामध्ये सर्वच राज्यात जुलै २०१७ मध्ये पंचवार्षीक पशुगणना होणे अपेक्षीत होते. मात्र, केंद्राचे अनुदान आणि...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017