गौंडखैरी येथील रेव्ह पार्टीवर छापा

गौंडखैरी - पोलिसांच्या विशेष पथकाने जप्त केलेले साहित्य व आरोपी.
गौंडखैरी - पोलिसांच्या विशेष पथकाने जप्त केलेले साहित्य व आरोपी.

कळमेश्वर (नागपूर) - नागपूर-अमरावती महामार्गावरील गौंडखैरी बरड येथे अवैधरित्या सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांच्या विशेष पथकाने छापामार कारवाई केली. या ठिकाणी युवक-युवती मद्य व हुक्‍क्‍याच्या धुंदीत नृत्य करीत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी या प्रकरणी ६ युवक, ७ युवती व १ महिला अशा एकूण १३ जणांना ताब्यात घेतले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्रीनंतर सुमारे पाऊनेदोन वाजता कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील गोंडखैरी (बरड) येथील वस्तीमध्ये रामकृष्ण मोतीलाल मारवाडी यांच्या बंगल्यात युवक-युवतींचे गैरकृत्य सुरू असल्याची माहिती पोलीस हवालदार प्रकाश उईके यांना मिळाली. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या सूचनेवरू न उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनात विशेष पथकाने छापा घातला. यावेळी युवक-युवती झिंगलेल्या अवस्थेत नृत्य करीत होते. याच ठिकाणी पोलिसांना विदेशी दारू व हुक्का पॉट आढळून आले. या रेव्ह पार्टीची जिल्ह्यात सर्वत्र चांगलीच चर्चा होती. 

पोलिसांनी ललित उदयसिंग, मोरेश्‍वर सुरेश मेश्राम, अजिब गुलाब खान, राहुल शैलेंद्र दहाटे, प्रदीप देवदास गणवीर, नितेश गोविंदराव माहूरे यांच्यासह ७ मुली व एका महिलेला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी कार, लॅपटॉप, साऊंड ऑपरेटिंग मशीन, एटीएम स्वाईप मशीनसह सुमारे ३ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.  ही कारवाही पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रम कदम, कळमेश्वरचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादूरे व सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी पार पाडली.

अनेक दिवसांपासून होते आयोजन
नृत्य करण्यासाठी नागपूरहून युवती आणण्यात आल्याचे सांगण्यात आले. सातपैकी दोघी सोलापूर व एक युवती उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथील आहे. त्यांच्यासाठी एका कारची सोय करण्यात आली होती. गौंडखैरी बरड येथे असलेल्या रामकृष्ण मारवाडी यांच्या बंगल्याला सामोरून कुलूप लावण्यात आले होते. पोलिसांनी मागच्या दाराने प्रवेश करीत ही कारवाई केली आहे. मागील अनेक दिवसांपासून या ठिकाणी अश्‍लिल नृत्याचे आयोजन केले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

कारवाईत रेव्ह पार्टीसाठी असलेली उपकरणे व साहित्य आढळून आलेले नाही. या अड्ड्यावर पोलिस मागील अनेक दिवसांपासून पाळत ठेवून होते. ताब्यात घेण्यात आलेले साधारण व्यक्ती आहेत. 
- विक्रम कदम, उपविभागीय पोलिस अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com