प्रा. साईबाबा नक्षलसमर्थकच 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मार्च 2017

गडचिरोली - देशविघातक कारवायांच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा झालेला दिल्ली विद्यापीठाचा प्राध्यापक जी. एन. साईबाबा याचा माओवादी संघटनांसोबत कुठलाही संबंध नाही, असे माओवाद्यांनी सांगितले होते. पण 29 मार्चच्या भारत बंदच्या निमित्ताने जिल्ह्यात लावलेल्या फलकांनी माओवाद्यांचा खोटारडेपणा उघडकीस आणला आहे, असे नक्षलविरोधी अभियानाने एका पत्रकाद्वारे स्पष्ट केले. माओवाद्यांनी या फलकातून साईबाबाला झालेल्या शिक्षेचा निषेध केला असून त्याच्या समर्थनार्थ भारत बंदचे आवाहन केले आहे. यावरून प्रा. साईबाबासोबत संबंध असल्याची कबुलीच नक्षलवाद्यांनी दिल्याचे नक्षलविरोधी अभियानाने पत्रकात म्हटले आहे. 

या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, नक्षलवाद्यांशी थेट संबंध आणि अनेक हिंसक घटनांचा मास्टरमाइंड असलेल्या प्रा. साईबाबाला गडचिरोली पोलिसांनी 9 मे 2014 रोजी दिल्ली येथून अटक केली होती. याबाबत गडचिरोली येथील सत्र न्यायालयात सहा आरोपींविरुद्ध तीन वर्षे खटला चालला. अखेर 7 मार्च 2017 रोजी जिल्हा व सत्र न्यायालयाने प्रा. साईबाबा, हेम मिश्रा, प्रशांत राही, महेश तिरकी, पांडू नरोटे यांना आजन्म कारावासाची, तर विजय तिरकी यास 10 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. त्यानंतर माओवाद्यांनी फलके लावून साईबाबाचा संबंध असल्याचे नाकारले होते. पोलिसांनी त्यांना खोट्या गुन्ह्यांखाली अटक केली आहे व एका अपंग विचारवंतावर नक्षलसमर्थक असल्याचा खोटा आरोप लावून त्यांचा छळ केला जात आहे, असे माओवाद्यांनी म्हटले होते. 

मात्र 29 मार्चच्या भारत बंदच्या निमित्ताने नक्षलवाद्यांच्या भामरागड एरिया कमिटीने एटापल्ली आणि भामरागड या भागात पोस्टर्स लावले आहेत. यात साईबाबा व त्याच्या पाच सहकाऱ्यांना न्यायालयाने ठोठावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेचा तीव्र विरोध करण्यात आला आहे. तसेच या सर्वांची तत्काळ सुटका करावी, यासाठी शहीद भगतसिह, राजगुरू, सुखदेव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 23 मार्च ते 29 मार्च या कालावधीत विरोध सप्ताह व 29 मार्च रोजी भारत बंदचे आवाहन केले आहे. यावरून सुरवातीला साईबाबासोबत संबंध नाकारणाऱ्या नक्षलवादी आणि त्यांच्या फ्रंटल संघटनांनी आता त्याचे थेट समर्थन केल्याने नक्षलवाद्यांचा दुटप्पीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे, असे नक्षलविरोधी अभियानाने म्हटले आहे. 

Web Title: porf. Saibaba Naxal framework