सोयाबीनचे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांचे 'रास्ता रोको'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

कारंजा - दिवाळीच्या सुटीनंतर पहिल्याच दिवशी व्यापाऱ्यांनी 1800 ते 2200 रुपये प्रतिक्विंटल दराने सोयाबीन खरेदी सुरू केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज कृषी उत्पन्न बाजार समितीबाहेर "रास्ता रोको' आंदोलन केले. आंदोलनामुळे कारंजा-मंगरुळपीर मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. 

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती दिवाळीच्या सुटीनंतर आज सुरू झाली. सकाळी दहा वाजता सोयाबीनच्या लिलावाला सुरवात झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी 2700 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव असताना 1800 ते 2200 रुपयांनी सोयाबीनचा लिलाव सुरू केला. आर्थिक लूट होत असल्याचे लक्षात येताच शेतकरी संतप्त झाले. त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील दोन नंबरच्या रोडवर धाव घेतली. बाजार समितीमधील शेकडो शेतकरी रस्त्यावर आले. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे कारंजा-मंगरुळपीर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. हमीभावाने सोयाबीनची खरेदी व्हावी, या मागणीवर शेतकरी ठाम होते. दोन तास मंगरुळपीर-कारंजा मार्ग बंद केल्यानंतर शेतकऱ्यांनी नागपूर-मुंबई राष्ट्रीय महामार्गाकडे मोर्चा वळविला. तेथे अर्धा तास ठिय्या दिला. त्यानंतर वाशीमवरून अतिरिक्त पोलिस बळ कारंजा येथे दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी सौम्य लाठीमार करून शेतकऱ्यांना पांगविले. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर ते बायपासपर्यंतचा रस्ता बंद केला. लाठीमार झाल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

विदर्भ

अकोला : राज्यभरामध्ये बीएचआरच्या पतसंस्था जळगाव यांच्या लाखो ठेवीदारांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या संस्थेच्या संचालकांची राज्य...

08.57 AM

नागपूर -  सरासरीपेक्षा अधिक तीन तास विक्रमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील अनेक वस्त्या जलमय झाल्या. नदी-नाले दुथडी भरून वाहत...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017

वर्धा - कारंजा तालुक्यातील सेलगाव येथील राहत्या घरी कपाटला अचानक विजेचा प्रवाह उतरल्याने त्याच्या झटका बसून आईसह चिमुकलीचा...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017