ऑटो, टॅक्‍सी भाडेनिश्‍चितीबाबत होणार जनमत सर्वेक्षण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

प्रवाशांनो, संकेतस्थळावर अभिप्राय नोंदवा : प्रादेशिक परिवहन विभागाचे आवाहन

नागपूर - ऑटो व टॅक्‍सी भाड्याचे सूत्र ठरविण्यासाठी ऑनलाइन जनमत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. प्रादेशिक परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर नागरिक, ऑटो व टॅक्‍सीचालकांनी अभिप्राय आणि तक्रारी नोंदवाव्या, असे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागातर्फे करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात धावणाऱ्या ऑटो व टॅक्‍सीचे भाडे ठरविण्यासाठी शासनाने समिती नियुक्त केली. या समितीने राज्यात विविध ठिकाणी बैठका घेतल्या. या माध्यमातून ऑटो-टॅक्‍सी संघटनांसोबतच ग्राहक प्रतिनिधीची मते नोंदवून घेण्यात आली. पण, विविध मुद्यांवर कमालीची मतभिन्नता पुढे आली.

परिणामी समितीला निर्णयाप्रत येण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. 
आता व्यापक स्तरावर भाडेनिश्‍चितीबाबत सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

भाडेनिश्‍चितीबाबत समितीच्या सर्वेक्षणात पुढे आलेल्या बाबी परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करून महाराष्ट्रातील जनता, ऑटो संघटनांचा अभिप्राय हे अर्जही प्रसिद्ध करण्यात येतील. हे अर्ज भरून संबंधितांना आपला अभिप्राय, तक्रारी, आक्षेप नोंदविता येणार आहे.

सर्वेक्षणासाठीचे अर्ज www.transport.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नागपूर व अमरावती विभागातील नागरिक, ऑटोरिक्षा, टॅक्‍सी चालक संघटनांनी यांनी अभिप्राय नोंदवावा, असे आवाहन शहर व ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: public survey for auto, taxi rent