पारडी, पुनापूर प्रभागात सर्वाधिक मतदान 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

नागपूर - सर्वाधिक श्रीमंत आणि सुशिक्षित नागरिकांचा भरणा असलेल्या सिव्हिल लाइन्स परिसरातील प्रभाग क्रमांक 14 येथे सर्वांत कमी मतदान झाले आहे. येथील मतदानाची टक्केवारी 46.03 इतकी आहे. याउलट सर्वच दृष्टीने मागास असलेल्या पारडी, पुनापूर, भांडेवाडी परिसराचा समावेश असलेल्या प्रभाग क्रमांक 25 येथून सर्वाधिक मतदान झाले आहे. येथील मतदानाची टक्केवारी 64.01 इतकी आहे. 

मतदानाविषयी सातत्याने जागृती केली जात आहे. प्रत्येकाने मतदान करावे असे आवाहन महिनाभरापासून केले होते. युवकांना आकर्षित करण्यासाठी आर्ची आणि परशा यांना निवडणूक आयोगाने ब्रॅंड ऍम्बेसिडर केले होते. याशिवाय नागपूर महापालिकेने विविध स्पर्धा घेतल्या. महाविद्यालये तसेच वर्दळीच्या ठिकाणी कार्यक्रम घेतले. यामुळे मतदानाचा टक्का चांगलाच वाढेल असा अंदाज वर्तविल्या जात होता. मात्र, सुशिक्षितांनी नेहमीप्रमाणे मतदानाकडे पाठ फिरवल्याचे आकडेवारी सांगते. प्रभाग क्रमांक 14 मध्ये राजभवन परिसर, टिळकनगर, रविनगर, रेल्वे वसाहत, प्रियदर्शिनी कॉलनी, गिट्टीखदान परिसराचा समावेश आहे. येथे फक्त सरासरी 46 टक्के मतदान झाले. महापालिकेच्या निवडणुकीत सरासरी 54 टक्के मतदान झाले. मागील निवडणुकीच्या तुलनेत दोन टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. प्रभाग क्रमांक 25 येथे सर्वाधिक मतदान सरासरी 64 टक्के, शिवणगाव, जयताळ्याचा समावेश असलेल्या प्रभाग 38 मध्ये 61, वाठोडा, दर्शन कॉलनीचा समावेश असलेल्या प्रभाग26 मध्ये 60.25 टक्के, कळमना, वांजरा, भरतवाड्याचा समावेश असलेल्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये 60.29 टक्के मतदान झाले आहे. उर्वरित प्रभागांमध्ये सरासरी 50 ते 58 टक्के मतदान झाले आहे. 

विदर्भ

अंध विनोद उकेची कैफियत - एंजिओग्राफीसाठी पाच हजार कोठून आणू? नागपूर - सुपर स्पेशालिटीत आमदार गिरीश व्यास रुग्णांच्या...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

विजेच्या धक्‍क्‍याने घेतला मुलांचा बळी नागपूर - उच्चदाबाच्या विद्युत तारांमुळे सुगतनगरमधील दोन जुळ्या भावांच्या मृत्यूला...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

सिमेंट रस्त्यांवरून वृद्ध, गर्भवतींचा प्रवास धोक्‍याचा नागपूर - शहरात मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्ते करण्यास महापालिकेने...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017