नऊ महिन्यांत केवळ पाच छापे

Prostitution
Prostitution

नागपूर - उपराजधानीतील वाढत्या गुन्हेगारीसह सेक्‍स रॅकेट्‌सची राज्यभरात चर्चा आहे. एकेकाळी सेक्‍स रॅकेटवरील कारवाईत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर असलेल्या नागपूर पोलिस विभागाला मात्र आता उतरती कळा लागली आहे. नागपूर पोलिसांनी नऊ महिन्यांत (सुमारे २६० दिवस) देहव्यापार चालणाऱ्या केवळ ५ ठिकाणी छापे घातले आहेत. २०१५ मध्ये एकूण ३५ छापे घालण्यात आले होते. 

अनैतिक-देहव्यापारास प्रतिबंध घालण्यासाठी सामाजिक सुरक्षा विभाग (एसएसबी) कार्यरत आहे. या विभागाने गेल्या नऊ महिन्यांत ५ छापे घातले असून केवळ १४ दलालांना अटक केली आहे. यामध्ये २ महिलांचा समावेश आहे. छाप्यात देहव्यापार करणाऱ्या २० मुलींना ताब्यात घेतले असून त्यामध्ये एका १३ वर्षीय मुलीचाही समावेश आहे. गेल्या पाच वर्षांत झालेल्या कारवाईमध्ये ही सर्वाधिक कमी असलेली आकडेवारी आहे. शहरात देहव्यापार बहरला असून पोलिसांचा नाकर्तेपणा आणि ‘अर्थपूर्ण’ संबंध यासाठी कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. शहरात जवळपास ८५ टक्‍के ब्यूटी पार्लर्स, लेडिज जिम-फिटनेस सेंटर्स, स्पा अँड मसाज तसेस आयुर्वेदिक बॉडी मसाज सेंटर्समध्ये देहव्यापार चालतो. यामध्ये महाराष्ट्राबाहेरच्या मुलींना येथे देहव्यापारासाठी ठेवण्यात येते. वर्षभरातील हा व्यवसायात जवळपास १०० कोटींपर्यंतची उलाढाल होते. याचे सामाजिक दुष्परिणामही दिसत आहेत. आंबटशौकिनांची संख्या वाढत असल्यामुळे देहव्यापाराला सुगीचे दिवस आले आहेत. नागपुरात ‘स्पेशल’ वेळी विदेशी युवतींनाही मुंबईचे दलाल नागपुरात करार तत्त्वांवर आणत असल्याची माहिती आहे.

झटपट पैशाचे आमिष
उपराजधानीतील देहव्यापारात शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनी, युवती, घटस्फोटित महिला, विवाहित महिला तसेच विधवासुद्धा पैशाच्या आमिषापोटी फसत असल्याची माहिती आहे. महिलांची, युवतींची आर्थिक परिस्थिती हेरून दलाल त्यांना जाळ्यात ओढतात. या व्यवसायात वयाच्या १३ व्या वर्षांपासूनसुद्धा मुलींना बळजबरीने आणल्याचीही नोंद आहे. मुलींना दारू, ड्रग्स, गांजा, हुक्‍का आणि अन्य अंमली पदार्थांची सवयी लावण्यात येतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com