हायप्रोफाइल ‘सेक्‍स रॅकेट’वरील छाप्यात विदेशी तरुणी ताब्यात

नागपूर - देहव्यापार करणाऱ्या रशियन युवतींना ताब्यात घेताना डीसीपी चिन्मय पंडित व ठाणेदार दिनेश शेंडे.
नागपूर - देहव्यापार करणाऱ्या रशियन युवतींना ताब्यात घेताना डीसीपी चिन्मय पंडित व ठाणेदार दिनेश शेंडे.

नागपूर - अजनी चौकातील केपीएन हॉटेलमधील हायप्रोफाइल ‘सेक्‍स रॅकेट’वर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात दलाल प्रणिता जयस्वालसह दोन रशियन युवतींना ताब्यात घेतले. ‘सकाळ’ने ‘सेक्‍स रॅकेट’बाबत बुधवारच्या अंकात वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर १२ तासांतच पोलिसांनी देहव्यापाराचा भंडाफोड केला, हे विशेष.

उपराजधानीत देहव्यापारावर ‘सकाळ’ने ‘देहव्यापाराची दलदल’ या वृत्तमालिकेतून प्रकाश टाकला आहे. शहरातील महिला दलाल प्रणिता जयस्वाल (रा. अथर्वनगरी, पिरॅमिड सिटीच्या मागे, पिपळा) हिच्या अड्ड्याबाबत वृत्त प्रकाशित होताच डीसीपी चिन्मय पंडित व धंतोलीचे ठाणेदार दिनेश शेंडे यांनी ‘सेक्‍स रॅकेट’ची पाळेमुळे खोदून काढली. अजनी चौकातील हॉटेल केपीएनमध्ये तिची बैठक असल्याची माहिती मिळताच सापळा रचण्यात आला.

बुधवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास धंतोली पोलिसांनी पंटर पाठवला. प्रणिता जयस्वाल व निखिल विलास शेंडे (रा. ओंकारनगर, निर्मल अपार्टमेंट) याची भेट घेतली. तिने विदेशी तरुणी असल्याचे सांगितले. तासाला १५ हजार रुपये सौदा ठरला. हॉटेलमधील रूम नं. २०१ मध्ये घेऊन गेली. तेथे दोन रशियन युवतींपैकी एकीची निवड करण्यात आली. पैशाचा व्यवहार होऊन रूम उपलब्ध झाल्यानंतर पंटरने पोलिसांना इशारा दिला. पीएसआय अनंत वडतकर यांनी छापा टाकून दोन्ही रशियन युवतींना ताब्यात घेतले. दलाल प्रणिता जयस्वाल व निखिल शेंडेला अटक केली. आरोपींकडून डॉलर, दिनार, आयफोनसह तीन महागडे मोबाईल, कार असा एकूण तीन लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.

विदेशी तरुणींची रेलचेल
प्रणिता जयस्वाल ही विदर्भातील सर्वांत मोठी दलाल आहे. तिचे राजकीय आणि शैक्षणिक जगतातील मोठमोठ्या धेंडांशी संबंध आहेत. स्थानिक पोलिसांशी ‘सेटिंग’ असल्यामुळे ती अमेरिका, रशिया, श्रीलंका, बांगलादेश, थायलंड आणि पाकिस्तान या देशांतील तरुणींना नागपुरात देहव्यापारासाठी आणते. त्यासाठी तिचा मुंबई आणि दिल्लीतील दलालांसोबत महिन्याकाठी करार असतो.

महिन्याकाठी करार
दोन्ही रशियन युवतींकडे टुरिस्ट व्हिसा आहे. अशा युवतींना ८ ते १० लाख देऊन ३० दिवसांच्या करारावर भारतात आणले जाते. आंबटशौकिनांकडून विदेशी तरुणींची मोठी मागणी आहे. त्यासाठी लाखोंत पैसा उधळण्याची तयारी दर्शविली जाते. नागपुरात आठ दिवसांच्या करारापोटी रशियन युवतींना पाच लाख रुपये मिळणार होते, अशी माहिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com