वाशीम जिल्ह्यात छापा, IPL वर सट्टा लावणाऱ्या सात जणांना अटक

Raid in Washim; seven arrested in case of IPL betting
Raid in Washim; seven arrested in case of IPL betting

वाशीम - जिल्हा पोलिस दलाच्या "कर्णधार'पदाची जबाबदारी मोक्षदा पाटील यांच्याकडे आल्यानंतर अवैध धंद्यांवर संक्रात आली आहे. जिल्ह्यातून अवैध धंदे हद्दपार होत असताना बुधवारी सकाळी पाच वाजता पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या विशेष पथकाने कारंजा येथे आयपीएल क्रिकेटवर चालणाऱ्या सट्ट्याच्या अड्ड्यावर छापा टाकून दोन लाखाचा मुद्देमाल व चार आरोपींना अटक केल्याची धडक कारवाई केली. दुसरी कारवाई मालेगाव येथे केली असून, येथे तीन जणाना अटक केली.

मोक्षदा पाटील यांनी रूजू झाल्यानंतर जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधत विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवायांचे धाडसत्र सुरू आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी स्थापन केलेल्या विशेष पथकाने बुधवारी 5 वाजता कारंजा येथील राजेश राठी यांच्याघरी वरच्या माळ्यावर आयपीएल क्रिकेटवर सुरू असलेल्या सट्टा अड्ड्यावर छापा टाकला. मोबाईलद्वारे सट्टा सुरू असताना सहाय्यक पोलिस निरीक्षक अजय वाढवे, इंगळे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राजेश राठी, गजानन रोकडे, कुंडलीक हातुलकार, ज्ञानेश्‍वर पाठे यांच्यावर जुगार कायद्याअन्वये कारवाई करून चार दूरदर्शन संच, तीन मोबाईल पॅनल, अठरा मोबाईल, पाच टेलीफोन,एक वायफाय राउटर, प्रिंटर, जुगाराचे दरपत्र, एक वातानुकुलीत यंत्र असा दोन लाख पाच चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

दुसऱ्या कारवाई अंतर्गत मोलेगाव शहराअंतर्गत मेहकर रोडवर स्वागत धाब्यासमोरील गोडावूनमध्ये अवैधरित्या जुगार खेळला जात असल्याच्या माहितीवरून पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण साळवे यांच्या पथकाने छापा टाकला असता संतोष सिताराम कव्हर यांच्या ताब्यातून एक टी.व्ही. मॉनेटर, डीव्हीआर असा चौपन्न हजाराचा मुद्देमाल जप्त करून गजानन रामचंद्र वाझुळकर, अरूण विश्‍वनाथ बळी, संतोष सिताराम कव्हर यांच्याविरूद्ध मुंबई पोलिस कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या धडक मोहिमेवरून अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com