शहरात पावसाचा हलका शिडकावा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

नागपूर - उन्हाच्या काहिलीने त्रस्त असलेल्या विदर्भातील नागरिकांना मंगळवारी अवकाळी पावसाने दिलासा दिला. नागपूरसह विदर्भातील अनेक शहरांमध्ये पावसाने हजेरी लावली. पावसाळी वातावरण आणखी एक-दोन दिवस कायम राहणार असल्याचे संकेत प्रादेशिक हवामान विभागाने दिले आहेत.

दिवसभर उन्हाचे चटके बसल्यानंतर सायंकाळी अचानक वातावरण बदलले. सातच्या सुमारास शहरातील अनेक भागांत विजांचा कडकडाट व वादळवाऱ्यांसह पाच ते दहा मिनिटे हलका शिडकावा झाला. पावसामुळे वातावरणात सुखद गारवा निर्माण होऊन तापमानातही किंचित घट झाली. विदर्भात चंद्रपूर येथे गारपिटीसह दमदार सरी पडल्याचे वृत्त आहे. याशिवाय गडचिरोली, यवतमाळ आणि भंडारा जिल्ह्यातही अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्‌टा छत्तीसगडमध्ये केंद्रित झाल्यामुळे सध्या विदर्भात ढगाळी वातावरण आहे. आणखी एक-दोन दिवस असेच वातावरण कायम राहणार असून, त्यानंतर हळूहळू उन्हाचा तडाखा वाढण्याची शक्‍यता आहे.

Web Title: rain in city