वाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 सप्टेंबर 2017

राळेगाव/मोहदा (जि. यवतमाळ) - शेतशिवारात दबा धरून बसलेल्या वाघाने तरुण शेतकऱ्याचा फडशा पाडला. ही घटना राळेगाव तालुक्‍यातील सखी येथे शनिवारी (ता. १६) दुपारी घडली. सतीश पांडुरंग कोवे (वय २२) असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला.

सतीश सकाळी गुरांना चराईसाठी शेतशिवारात घेऊन गेला होता. दुपारी बाराला एका झाडाखाली बसून असताना वाघाने झडप घेऊन त्याला फरपटत जंगलाकडे नेले. घटनेची माहिती मिळताच पंचनामा करण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सखी गाठले; मात्र त्यांना संतप्त ग्रामस्थांनी गावाबाहेर काढले.

जोपर्यंत वाघाचा बंदोबस्त करण्याचे आश्‍वासन मिळत नाही, तोपर्यंत पंचनामा करू देणार नाही, असा पवित्रा घेतला. सतीश अविवाहित होता. त्याच्या पश्‍चात आईवडील आहेत. गणेश चतुर्थीपासून नरभक्षक वाघाने दुसरा बळी घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. दरम्यान, वनविभागाचे वाहन समजून राळेगावचे उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांचे शासकीय वाहन जाळण्यात आले. माजी मंत्री वसंत पुरके परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. 

आतापर्यंत सात बळी
गणेश चतुर्थीच्या दिवशी २३ ऑगस्टला सराटी येथील गजानन पवार (वय ३६) यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. आतापर्यंत वाघाने हल्ला करून सात जणांचे बळी घेतले. यात सोनाबाई घोसले (रा. बोराटी), सखाराम टेकाम (झोटिंगधरा), मारोती नागोसे (खैरगाव कासार), संदीप कोवे, प्रवीण सोनोने (तेजणी), सतीश कोवे यांचा समावेश आहे.

शॉर्पशूटरला अपयश
गेल्या वर्षी वाघाने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे वाघाला जेरबंद करण्याचा प्रस्ताव वनविभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता. एक महिन्यासाठी शॉर्पशूटरची नियुक्ती करून वाघाला दुसरीकडे हलविण्यास परवानगी मिळाली होती. नागपूर येथील शॉर्पशूटरने सराटीच्या जंगलात एक महिना ठिय्या दिला. मुदत संपल्यानंतर वाघाला जेरबंद करण्याचे अभियान गुंडाळण्यात आले.