‘आयबी’च्या अधिकाऱ्याने केला बलात्कार

‘आयबी’च्या अधिकाऱ्याने केला बलात्कार

नागपूर - गुप्तचर तपास यंत्रणेतील एका पोलिस अधिकाऱ्याने सुरक्षा दलात नोकरीवर असलेल्या युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. युवतीने लग्नाचा तगादा लावला असता लग्नास नकार दिला. या प्रकरणी आयबीच्या पोलिस अधिकाऱ्यावर गणेशपेठ पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. अमितकुमार शर्मा (वय ३६) असे आरोपी पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित कुमार हा इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) मध्ये सहायक पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे. तो धनबाद, झारखंड येथील रहिवासी असून, सध्या दिल्लीत कार्यरत आहे. तक्रारदार युवती (वय २६) मूळची सावनेर तालुक्‍यातील एका खेडेगावची आहे. ती राज्य सुरक्षा दल (एमएसएफ) नोकरीला आहे. धनबाद येथे कार्यरत असताना तिची तीन वर्षांपूर्वी अमितकुमार शर्मासोबत ओळख झाली. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. तरुणीने तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे शर्माने यावेळी तिला गुंगी येणारा पदार्थ खाऊ घातला आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तो तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन शरीरसंबंध जोडू लागला. तो लग्न करणार असल्याची खात्री असल्याने तरुणी गप्प राहायची. शर्माने तिला चांगल्या नोकरीसोबत लग्नाचेही आमिष दाखवले. त्यानंतर ते एकमेकांसोबत इकडे तिकडे जाऊ लागले. 

बदनामीची दिली धमकी
दोन वर्षांपूर्वी ती आपल्या गावी सावनेरला आली. १५ एप्रिलला नागपुरात आल्यानंतर ते दोघे सेंट्रल एव्हेन्यूवरील हॉटेल राजहंसमध्ये रूममध्ये थांबले. १५ एप्रिल ते १५ मे या कालावधीत त्यांच्यात वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित झाले. त्यानंतर लग्नाचा विषय निघताच शर्मा तिला टाळू लागला. बदनामीची धमकी देऊ लागला. त्याने विश्वासघात केल्यामुळे तरुणीने गणेशपेठ पोलिसांकडे तक्रार नोंदवली.

आरोपीचा शोध सुरू
पीएसआय यू. एन. मडावी यांनी सोमवारी रात्री गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे. विशेष म्हणजे, गुप्तचर यंत्रणेत कार्यरत व्यक्तींचा सामान्य नागरिकांशी फारसा संबंध येत नाही. ते गोपनीय आणि ओळख लपवूनच काम करतात. शर्माने कशी काय ओळख जाहीर केली, ती बाब पोलिस अधिकाऱ्यांनाही धक्का देणारी ठरली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com